नागपूर

Nagpur: सोने लंपास करणारी ‘गुलाबी गँग’अटकेत! सहा महिलांचा समावेश, 'असा' झाला पर्दाफाश

ज्वेलर्सच्या दुकानात काम करीत तिथे टप्प्याटप्‍प्यांने सोने आणि चांदीची चोरी करणारी महिला आणि मुलींच्या ‘गुलाबी गँग’चा तहसील पोलिसांनी पर्दाफाश केला.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Gold Jewellery Theft: ज्वेलर्सच्या दुकानात काम करीत तिथे टप्प्याटप्‍प्यांने सोने आणि चांदीची चोरी करणारी महिला आणि मुलींच्या ‘गुलाबी गँग’चा तहसील पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यांच्याकडून १ हजार ४५० ग्रॅम सोने आणि साडेदहा किलो चांदी असा ९४ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा महिलांवर गुन्हा दाखल केला असून चार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अस्मिता उर्फ स्वाती प्रकाश लुटे (वय ३९, रा. वर्धमाननगर, देशपांडे ले आउट), प्रिया प्रणव राऊत (वय ३०, ४ पवनगाव रोड, कळमना), पूजा राजाराम भनारकर (वय २०, रा. नंदगिरी रोड, पाचपावली), कल्याणी मनोज खडतकर (वय ३३, रा. श्रीकृष्णनगर) अशी अटकेतील महिला व युवतींची नावे आहेत. भाग्यश्री पवन इंधनकर (वय ३०, रा. तिननल चौक, तहसील), मनीषा ओमप्रकाश मोहुर्ले (वय ३८, रा. प्रेमनगर, झेंडा चौक, शांतीनगर)यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता ऊर्फ स्वाती ही गेल्या काही वर्षांपासून तहसील येथील चिमुरकर ज्वेलर्समध्ये काम करीत होती. ती पूर्वी सोन्याचांदीच्या दागिण्यांची विक्री ते बिलिंग करण्यापर्यंतची सर्व कामे करायची, त्यानंतर मनीषा तिथे कामाला लागली. तीही जवळपास हीच कामे करायची.

त्यानंतर प्रिया, कल्याणी, पूनम आणि भाग्यश्री याही येथे सेल्सगर्ल म्हणून रुजू झाल्या. या सर्वांवर मालकांचा विश्‍वास बसल्यानंतर त्या दुकानातील सोने आणि चांदीच्या वस्तू थोड्या-थोड्या प्रमाणात काढून घ्यायला लागल्या.

विशेष म्हणजे, याबाबत मालक शंतनू चिमूरकर (वय २८ रा. रेशीमबाग) यांनी कधीही किती विक्री झाली आणि किती माल शिल्लक आहे, याची कधीही विचारणा केली नाही. त्यामुळे याचा फायदा घेत, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांची ही चोरी सुरूच होती. त्यानुसार पोलिसांनी एकूण १ हजार ४५० ग्रॅम सोने आणि साडेदहा किलो चांदी जप्त केली. चारही महिला आरोपींना अटक करीत, पोलिसानी कोठडी मिळविली. आता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

असे फुटले बिंग

जुलै महिन्यात चिमूरकर ज्वेलर्स येथून सोन्याची अंगठी चोरीला गेली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी जयेश सोनकुसरे याला अटक केली. त्याने या प्रकरणात माहिती देताना, येथे काम करणाऱ्या महिला यापेक्षा जास्त चोरी करीत असल्याची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली असता हा सगळा प्रकार समोर आला. त्यानुसार पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सोने जप्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: छत्रपती शिवाजी महाराजांची अन् रामदासांची भेट कुठे झाली? स्थळ, ठिकाण, वेळ कोणती?; अमित शहांना कुणी दिलं ओपन चॅलेंज

Indrajeet Sawant : “अमित शहांच्या विधानामागं व्यूहरचना"; शिवराय-रामदास स्वामींबाबतकेलेल्या विधानावर इंद्रजीत सावंतांची टीका

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत निवडणूक निरीक्षक कटारा यांचे राजकीय प्रतिनिधींना मार्गदर्शन

Dombivali Assembly Election : विधानसभा निवडणूका लागताच डोंबिवलीतील रस्ते डांबराने केले गुळगुळीत

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत स्टार प्रचारकांसाठी राजकीय पक्षांची धडपड; बाॅलिवूड, टाॅलीवूडशी संपर्क

SCROLL FOR NEXT