कन्हान : भांडण सोडविण्यास गेलेल्या युवकावर चाकू आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याची घटना कन्हान येथील अशोकनगरात घडली. या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कन्हान येथील सय्यद शाहरुख रेश्मा सय्यद(वय२६) हा सकाळी साडेदहा वाजता मित्र लक्की नाईक याच्यासोबत पिपरी गाडेघाट रोडवर असलेल्या सुनील उमरकर यांच्या सलूनच्या दुकानाशेजारी असलेल्या फुटपाथवर बसले होते.
दोघांच्या गप्पागोष्टी सुरू असताना दोन दुचाकीवरून हातात चाकू, काठ्या घेऊन आले आणि तू काल मला मारायला आला होतास का?’ अशी विचारणा लकीला केली. सोबतच शिवीगाळही सुरू केली.
तसेच सुमेश भीमराव रामटेके(वय ३१) याने लक्कीच्या मनगटावर काठी मारत जखमी केले. मित्राला मारहाण सुरू असल्याने शाहरूख मध्ये पडला. यामुळे संतापलेल्या विशालने तू मध्ये का येतोस, पहिल्यांदा तुलाच टपकावतो’ असे म्हणत शाहरूखवर चाकूने दोन-तीनवेळा वार केले.
वार चुकवीत जीव वाचविण्यासाठी शाहरूखने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता विशालने त्याच्या डाव्या पायावर चाकूचा वार केला. सोबतच विशालचा साथीदार सुमेश आणि अन्य आरोपींनीही शाहरूखच्या दोन्ही पायावर चाकूने वार केले.
मारहाण होत असल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करीत शाहरूखला कन्हान येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी नागपूर येथील मेयो रुग्णालयात रेफर केले.
शाहरूखच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विशाल चिंचुलकर, सुमेश रामटेके, अविनाश सहारे, रितेश चावके यांना अटक केली. तसेच सहा आरोपींविरुद्ध अप क्र. ७९८/२३ कलम ३०७, २९४, १४३, १४४, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात अमितकुमार आत्राम करीत आहेत. तसेच फरार झालेल्या दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.
चाकूचे आणि काठीचे वार होत असतानाही शाहरूख उमरकर यांच्या दुकानात घुसला असता आरोपीही मागोमाग आले. त्यांनी काठीच्या वाराने दुकानाची काच फोडत समोर उभ्या असलेल्या एमएम-४०-७८१५ क्रमांकाच्या दुचाकीची तोडफोड केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.