नागपूर

Nagpur Water Purifier: जलशुद्धीकरण यंत्र ठरतेय पांढरा हत्ती! ४८ लाखांचा खर्च गेला पाण्यात, यंत्र दोन वर्षांपासून बंद

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Water Purifier Shut Down: नागरिकांना पिण्याचे शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळावे म्हणून दोन वर्षांपूर्वी जिल्हा खनिज विकास निधी आणि १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केळवद येथे चार जलशुद्धीकरण सयंत्र उभारण्यात आली. पण, दुर्दैवाने यातील तीन यंत्र बंद आहेत. ४८ लाख खर्च करूनही या सयंत्रांचा काहीच उपयोग नाही. दोन वर्षांपूर्वी माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते या सयंत्रांचे उद्‍घाटन झाले होते.

एक सयंत्राची किंमत १६ लाख रुपये आहे. चारपैकी केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्र सुरू आहे. उर्वरित तीन बंद आहेत. लाखो रुपये खर्च करून चार सयंत्र बसविल्याने आता भरपूर प्रमाणात शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल, या आशेवर केळवदमधील नागरिक होते. पण, नागरिकांची आशा फोल ठरली आणि लाखो रुपयेही पाण्यात गेले.

१६ जानेवारी २०२२ रोजी सुनील केदार यांच्या हस्ते जलशुद्धीकरण सयंत्रांचे उद्‍घाटन झाले होते. विशेष म्हणजे, सयंत्रांची देखभाल, दुरुस्ती आणि पाणी पुरवठा करण्याची सोय नसताना ऐन मोक्याच्या ठिकाणी लाखो रुपये खर्चून सयंत्र उभारी कशाला? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. उन्हाळा सुरू होत असल्याने आता तरी सयंत्र सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Latest Marathi News)

बाजारपेठेतील मुत्रीघर बंद

केळवद येथे मोठी बाजारपेठ असून येथे ग्राहक,व्यापारी आणि दुकानदारांची संख्या मोठी आहे. गर्दीच्या ठिकाणी मुत्रीघर असणे आवश्यक आहे. पण, गेल्या कित्येक दिवसांपासून मुत्रीघर बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. निदान मुत्रीघर तरी तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT