crime news esakal
नागपूर

कोल्हे हत्याकांड : आरोपीला नागपुरातून अटक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अमरावतीमधील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्याकांडातील फरार आरोपी शेख इरफान शेख रहिम (३२) रा. कमेला ग्राऊंड, अमरावती यास अमरावती पोलिसांनी नागपुरातून अटक केली. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे अमरावतीमधील औषध विक्रेता उमेश कोल्हे हे समर्थक होते. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कोल्हे यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांची २१ जूनला दुचाकीने आलेल्या आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली होती. सातवा आरोपी शेख इरफान हा फरार होता.

तो शहर सोडून दुसऱ्या शहरात गेल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. इरफान हा नागपुरात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळताच आज नागपुरात पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने इरफानला अटक केली. त्याला सायंकाळी अमरावतीला नेण्यात आले. शेख इरफान हा स्वयंसेवी संस्था चालवित होता. मुख्य आरोपी शमीम आणि त्याच्या मित्रांना इरफाननेच प्रोत्साहन दिले होते. आरोपींना काही रुपये आणि कार उपलब्ध करण्याची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. कोल्हे हत्याकांडाचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक अमरावतीत दाखल झाले असून नूपूर शर्मा यांचे समर्थक असल्यामुळेच कोल्हे यांचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT