st sakal
नागपूर

लालपरी येतेय पूर्वपदावर!

पाच लाखांचे उत्पन्न : शुक्रवारी दोन कर्मचारी कामावर परतले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खासगी चालकांच्या बळावर एसटी प्रशासनाने बसगाड्यांची संख्या वाढल्यानंतर आज ६५ बसगाड्या धावल्या. साडेपाच हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून एसटी प्रशासनाला (ST Administration) एकाच दिवशी तब्बल ५ लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे (Nilesh Belsare) यांनी दिली.

दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटूनही संपावर असलेले कर्मचारी कामावर परत येण्याच्या मार्गावर नसल्याचे बघून एसटी प्रशासनाने एसएसके या खासगी एजन्सीची निवड केली. नागपूर विभागातून या एजन्सीच्या माध्यमातून खासगी चालकांच्या हाती एसटीची स्टेअरींग दिली. शुक्रवारी २९ खासगी चालक व काही एसटी चालकांच्या बळावर ६५ बसगाड्या धावल्या. यामध्ये गणेशपेठ ३९, इमामवाडा ४ घाटरोड ५, उमरेड ३, सावनेर ५, वर्धमान नगर ६, काटोल १ आणि रामटेक २ या आगारातून ६५ बसगाड्या धावल्या. ६५ बसगाड्यांनी १६५ फेऱ्या केल्या. त्यातून एसटीला ५ लाख ५ हजार ६९६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर शुक्रवारी ५ हजार ७२९ प्रवाशांनी प्रवास केला.

कामावर परतणाऱ्यांची संख्या मात्र मोजकीच आहे. शुक्रवारी केवळ २ कर्मचारी कामावर रुजू झाले. डिसेंबरच्या २१ तारखेपासून आता पर्यंत केवळ १२४ कर्मचारी कामावर परतले आहेत. यात चालक ३८ आणि वाहक ४८ या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागपूर विभागात प्रशासकीय ४७६, कार्यशाळा ५३०, चालक ७५२, वाहक ६१९ असे एकूण २ हजार ३७७ कर्मचारी आहेत. एवढ्या कर्मचाऱ्यांपैकी केवळ १२४ कर्मचारी कामावर परतल्याने प्रशासनाला घाम फुटला. संप मोडून कामावर परतण्यासाठी कर्मचारी काही केल्या ऐकत नसल्याने शेवटी प्रशासनाने एसटीचे स्टेअरींग खासगी चालकांच्या हाती दिले.

पुन्हा १८ कर्मचारी बडतर्फ

खासगी चालकांच्या हाती एसटीची स्टेअरींग सोपवून प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शुक्रवारी तब्बल १८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. सावनेर आगारातून चालक ५ आणि वाहक ४ असे एकूण ९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर गणेशपेठ आगारातून चालक ४, वाहक ४ आणि यांत्रिक १ असे एकूण ९ कर्मचारी आहेत. सावनेर आणि गणेशपेठ मिळून १८ कर्मचारी शुक्रवारी बडतर्फ करण्यात आले आहे. आता पर्यंत बडतर्फ करण्यात आलेल्यांचा आकडा १६० वर पोहोचला आहे. यामध्ये चालक ७१, वाहक ६५, चालक तथा वाहक ४ आणि यांत्रिक २० असे एकूण १६० कर्मचारी बडतर्फ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT