Nitn Gadkari sakal
नागपूर

Nagpur Lok Sabha Election Result : विजयाची हॅट्‌ट्रिक! गडकरींकडून ठाकरे पराभूत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजयाची हॅटट्रिक करून नागपूरमध्ये सलग तिसऱ्यांदा काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला.

मंगेश गोमासे

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजयाची हॅटट्रिक करून नागपूरमध्ये सलग तिसऱ्यांदा काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीच्या तुलनेत त्यांचे मताधिक्य तब्बल दीड लाखांनी घसरले आहे. ही आगामी विधानसभेत भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

नितीन गडकरी यांना एकूण ६ लाख ५५ हजार २७ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना ५ लाख १७ हजार ४२४ मते मिळाली आहेत. गडकरी एकूण एक लाख ३७ हजार ६०३ मतांनी विजयी झाले. गडकरी यांनी पाच लाखांनी निवडून येण्याचा दावा केला होता हे विशेष.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच नितीन गडकरी यांनी आघाडी घेतली होती. मध्यल्या दोन फेऱ्यांचा अपवाद वगळता गडकरी यांनी ठाकरे यांना शेवटपर्यंत हावी होऊ दिले नाही. गडकरी यांनी आपल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुमारे तीन लाखांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना पराभूत केले होते.

त्यानंतर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पराभूत केले. त्यावेळी गडकरी यांचे मताधिक्य २ लाख १६ हजार इतके होते. हे बघता यावेळी गडकरी किती लाखांच्या मताधिक्याने निवडून येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

यंदाची निवडणूक गडकरी यांच्यासाठी खास ठरली. काँग्रेससोबत त्यांचा थेट सामना झाला. मतविभाजन करणारे इतर राष्ट्रीय पक्षाचे प्रबळ उमेदवार रिंगणात नव्हते. वंचित बहुजन आघाडीने विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. बसपाने एकदम नवखा उमेदवार दिला. एमआयएमने उमेदवारच दिला नाही.

याशिवाय महाविकास आघाडी एकजूट होती. यावरून गडकरी यांचे मताधिक्य घटणार असाच सर्वत्र अंदाज वर्तविला जात होता. तो खराही ठरला. दुसरीकडे भाजप मतविभाजन करूनच निवडून येऊ शकते हा ठपकाही थेट लढत देऊन गडकरी यांनी पुसून काढला.

काँग्रेसची अडीच लाखांची निश्चित मतपेढी असताना विकास ठाकरे यांनी सुमारे सव्वापाच लाख मते घेऊन यात भर टाकली. ही काँग्रेससाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल. दरम्यान गडकरी यांनी केलेले विकासाचे राजकारण आणि शहरासह देशाच्या महामार्गांचा बदललेला चेहरा-मोहरा, याचेच चित्र म्हणजे गडकरींची लोकप्रियता आहे.

देशवासीयांच्या याच प्रेम आणि विश्‍वासामुळे हा विजय मिळाला असल्याची भावना गडकरी यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली. तसेच, नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याची भावना त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. देशातील विकसित शहरांच्या यादीत नागपूरला स्थान मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. आपले प्रेम व आपला विश्वास हीच माझी मोठी ताकद असल्याचे गडकरी म्हणाले.

योगेश लांजेवार - १९,२४२ (बसप)

कृष्णा सूर्यवंशी - २,०५९

आनंदकुमार गुरुडाधारी - ७२०

दीपक मस्के - ४७१

नारायण तुकाराम चौधरी - २५१

फहिम शमीम खान - १०७३

विजय मानकर - ६१०

विशेष वसंत फुटाणे - ५६२

श्रीधर साळवे - ४५१

सुनील वानखेडे - ३२२

सूरज मिश्रा - ८१७

संतोष लांजेवार - ५६७

आदर्श ठाकूर - १७५०

उल्हास दुपारे - १३४८

टेकराज बेलखोडे - ८०८

धनू वलथरे - ६९२

प्रफुल्ल भांगे - २०१

बबिता अवस्थि - १८२

विनायक अवचट - १९०

सचिन वाघाडे - २०२

साहिल तुरकार - १२९

सुशील पाटील - २३७

संतोष चव्हाण - २४२

नोटा - ५४७४

अवैध मते - ४५०

वैध मते - १२ लाख ११ हजार ७७१

नागपूरला विकसित शहरांच्या यादीत आणणार - गडकरी

रोडकरी म्हणून संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरी यांचा आजचा विजय सलग तिसरा विजय ठरला. केवळ मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. निकालानंतर देशातील विकसित शहरांच्या यादीत नागपूरला स्थान मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया देत नितीन गडकरी यांनी पुन्हा जनतेची मनं जिंकली. विजय निश्‍चित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

  • नितीन गडकरी - ६ लाख ५५ हजार २७ मते

  • विकास ठाकरे - ५ लाख १७ हजार ४२४ मते

  • मताधिक्य - १ लाख ३७ हजार ६०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT