Loksabha Election  Esakal
नागपूर

Loksabha Election:कर्मचाऱ्यांच्या आदेशपत्रावर राहणार क्यूआर कोड,नियुक्तीची माहिती एका क्लिकवर; निवडणुकीसाठी प्रथमच वापर

लोकसभा निवडणुकीसाठी ३५ हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या आदेशपत्रावर क्यूआर कोडचा वापर करण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lok Sabha Election QR Code on Officers Appointment Letter: लोकसभा निवडणुकीसाठी ३५ हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या आदेशपत्रावर क्यूआर कोडचा वापर करण्यात येत आहे. यामुळे त्यांना कोणत्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघात नियुक्ती दिली आहे. याची माहिती एक क्‍लिकवर प्रशासनाला कळणार आहे. प्रथमच आदेशावर क्यूआर कोडचा वापर करण्यात येत आहे.

क्यूआर कोडचा वापर केल्यामुळे मास्टर डेटाबेसमधून हजेरीपटानुसार उपस्थित, अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी, पोस्टल बॅलेटसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी ही अवघ्या काही मिनिटातच तयार होणार आहे. या सर्व याद्या बनविण्यासाठी जवळपास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो आणि मोठ्या मनुष्यबळाचा वापर होतो.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आदेशात क्युआर कोड दिल्यामुळे या सर्व याद्या काही तासातच तयार होणार आहेत. ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना विज्ञान केंद्र नागपूर यांच्याकडे नमूद केलेल्या पथकाने अहोरात्र परिश्रम करून प्रथमच क्यूआर कोड तयार केले आहेत.

त्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, एनआयसीच्या नोडल अधिकारी क्षमा बोरोले, वेस्टन कोल्ड फील्ड लिमिटेडचे मॅनेजर (सिस्टिम) नितीन गुप्ता, रोहित कुमार, तलाठी नितीन निमजे यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. लोकसभा निवडणुकीच्या मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी वेस्टन कोल्ड फिल्डचे दुष्यंत चव्हाण, हेमंत श्रीवास्तव, राम कटियार, मुकेश अग्रवाल, मुकेश पवार यांनी अहोरात्र काम केले आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाच्या आहे. त्यानुसार या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली.- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate List: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; सांगलीतून पृथ्वीराज पाटील, 'कोल्हापूर उत्तर'मधून 'यांना' संधी

Washim Assembly election: उमेदवारी नाकारल्याने आमदार मलिक यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्यांना बोलून भूमिका घेणार असल्याचा इशारा

चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स शिवाय क्रिकेटही.. सगळं काही जर्मनीमध्ये

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Ulhasnagar Assembly Elections 2024: पुन्हा 'कलानी' विरुद्ध 'आयलानी' आमनासामना

SCROLL FOR NEXT