Vanchit Bahujan Aghadi  Esakal
नागपूर

Loksabha Election: काँग्रेसला सात जागांवर वंचित करणार मदत, प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषदेत माहिती

महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार उभा राहील त्यापैकी सात जागांवर वंचितची त्यांना साथ असेल, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मंगळवारी येथे एका पत्रपरिषदेत घोषित केले.

सकाळ डिजिटल टीम

Prakash Ambedkar Proposal for Congress: राजकारणात नेहमी पॉझिटिव्ह राहिले पाहिजे. त्यामुळे आम्ही काँग्रेससमोर कोणत्याही अटी व शर्ती ठेवलेल्या नाहीत. महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार उभा राहील त्यापैकी सात जागांवर वंचितची त्यांना साथ असेल, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मंगळवारी येथे एका पत्रपरिषदेत घोषित केले. मात्र, काँग्रेसकडून अद्याप या प्रस्तावाबाबत कोणताही निर्णय आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबतचा तिढा अद्याप सुटू शकला नाही. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना आज मंगळवारी एक पत्र पाठविले आहे. त्यात वंचितची भूमिका स्पष्ट केल्याची माहिती आंबेडकर यांनी यावेळी दिली. फॅसिस्ट, फुटिरतावादी, लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएस सरकारला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील सात जागांवर काँग्रेसला मदत करेल.

काँग्रेसने त्यांच्या मिळालेल्या कोट्यातून त्यांच्या पसंतीच्या सात मतदारसंघाची नावे द्यावीत. तेथे आम्ही धोरणात्मक पाठिंबा देऊ, असे आंबेडकर म्हणाले. काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाहीतर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

मुंबईतील ‘भारत जोडो’ यात्रेच्या समापन समारोहात राहूल गांधी व मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी भेट झाल्याचे व त्यात महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित न केल्याबाबत खंत व्यक्त केल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी राहूलसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. मात्र राजकारणाविषयी चर्चा होवू शकली नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. पत्रपरिषदेला प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जि.प.चे माजी अध्यक्ष बालमुकूंद भिरड, प्रमोद देंडवे, नीलेश देव आदी उपस्थित होते.

सेना, राष्ट्रवादीवरील विश्वास उडाला

सांगलीच्या जागेवरून सेनेचे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांनी कठोर शब्दात टीका केली. राष्ट्रवादी व सेनेसोबतच्या संबधांबाबत ते म्हणाले की, राजकारणात कुणासोबतही सर्व दिवस चांगलेही नसतात व वाईटही नसतात.

सगळे दिवस सारखेच असतात. महाविकास आघाडीच्या बैठकींमध्ये शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या दोन्ही पक्षांनी वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे ऐकून घेण्यासही नकार दिला. या असमान वागणुकीमुळे दोन्ही पक्षांवरील आपला विश्वास उडाल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT