Nagpur crime  sakal
नागपूर

Nagpur crime : दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राचा खून करणाऱ्यास जन्मठेप

Nagpur crime : लॉकडाऊन काळात मद्याच्या वादातून मित्राचा खून करणाऱ्या नागपूरच्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाऊन काळात बेरोजगार मजुराने दारू पिण्यासाठी पैसे देत नसलेल्या मित्राला चाकूने भोसकून ठार मारले. याप्रकरणी दोषी आशिष उर्फ मोमबत्ती जोध (वय ३३, रा. आशीर्वादनगर सक्करदरा) याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप, सात हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

त्याच्यावर अमोल शिल्लार (वय ३२, रा. आशीर्वादनगर, सक्करदार) याच्या खुनाचा सक्करदरा ठाण्यात गुन्हा दाखल होता.अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जे. पवार यांनी हा निर्णय दिला. ही घटना १ जुलै २०२० रोजी घडली होती. या काळात कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनमुळे काम बंद होते.

दारूची दुकानेही बंद असल्याने मद्यपींना अतिरिक्त पैसे मोजून ब्लॅकमध्ये दारू खरेदी करावी लागत होती. एकाच परिसरात राहणारे मोमबत्ती आणि अमोल दोघेही चांगले मित्र होते. अमोलकडे दारू असल्याचा मोमबत्तीचा समज झाला होता. त्यामुळे, तो अमोलला दारू मागत होता. यावरून त्यांच्या वाद सुरू होता. याच वादातून मोमबत्तीने १ जुलै २०२० रोजी रागाच्या भरात आशिर्वादनगरातील त्रिकोणी गार्डनजवळ दुपारी आशिषवर चाकूने वार केले.

यात अमोल जखमी झाला. रात्री सातच्या सुमारास अमोलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोमबत्तीला अटक करीत तपासाअंती आरोपपत्र दाखल केले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित शिक्षा सुनावली. शासनातर्फे पंकज तपासे यांनी बाजू मांडली.

जखमी अवस्थेत भावाला सांगितली आपबिती

मोमबत्ती अमोलवर चाकूने वार करीत आहे, अशी माहिती अमोलचा भाऊ सतीशला वस्तीतील एका मुलाने दिली. सतीश यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना पाहून मोमबत्तीने तेथून पळ काढला. दोघांच्या मदतीने सतीश यांनी अमोलला रुग्णालयात नेण्यासाठी दुचाकीवर बसविले. रुग्णालयापर्यंत पोहोचतपर्यंत जखमी असलेल्या अमोलने घटनाक्रम भाऊ सतीश यांना सांगितला. खटल्यात सतीश यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT