Nagpur Hospital  Esakal
नागपूर

Nagpur: गरीब रुग्णांची छुप्या मार्गाने लूट, रक्ताच्या चाचण्यांसाठी पाठवलं जातय खासगी पॅथालॉजीत,मेयो रुग्णालयातील प्रकार

गरिबांचा आधार म्हणून मेयोकडे बघितले जाते. या रुग्णालयात रक्त चाचण्यांसाठी २४ तास मध्यवर्ती प्रयोगशाळा असूनही खासगी पॅथालॉजीमध्ये चाचण्या करण्यासाठी व रुग्णांना बाहेरून औषध खरेदीची सक्ती डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Government Hospital: गरिबांचा आधार म्हणून मेयोकडे बघितले जाते. या रुग्णालयात रक्त चाचण्यांसाठी २४ तास मध्यवर्ती प्रयोगशाळा असूनही खासगी पॅथालॉजीमध्ये चाचण्या करण्यासाठी व रुग्णांना बाहेरून औषध खरेदीची सक्ती डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. डॉक्टर खासगी फार्मसीतून औषध खरेदी करून आणा, असे सांगत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. यामुळे रुग्णांची छुप्या मार्गाने लुट होत असल्याचे दिसत आहे.

विदर्भातील मोठे रुग्णालय मेयो आहे. गरिबांना येथे मोफत औषधोपचार मिळावा असा नियम आहे. परंतु याला हरताळ फासला जात आहे. औषधांचा तुटवडा असल्याचे सांगत गरीब रुग्णांच्या नातेवाइकांच्या हातात औषधांच्या चिठ्ठ्या दिल्या जातात. २४ तास रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू असताना चाचणीसाठी रुग्णाला मध्यरात्री बाहेरचा रस्ता दाखवला जातो. विशेष म्हणजे मेयोमध्ये रक्तचाचणी होत नाही, असे कारण खुद्द डॉक्‍टरच सांगतात याचेच आश्‍चर्य आहे.

रात्रीस खेळ चाले...

शालिनी नामदेव पिपळीकर यांना मेयोतील अतिदक्षता विभागात सुरुवातीला दाखल करून घेतले नाही. मात्र मानवअधिकार कार्यकर्ते मंगेश कामळी पोचल्यानंतर त्यांना दाखल करून घेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या नातेवाइकांच्या हाती प्रिस्क्रिप्शन दिले गेले. विशेष असे की, औषध आणि चाचण्यांसाठी मध्यरात्रीचे टायमिंग साधले जाते.

अशाप्रकारे रात्री विविध प्रकारच्या फंड्यांचा वापर डॉक्टरांकडून सुरू आहे. २४ तास येथे क्लिनिकल लॅब सुरू असतानाही येथे चाचण्या होत नाहीत, असे सांगून बाहेरच्या प्रयोगशाळेत रुग्णांना पाठवले जाते, तेही मध्यरात्रीनंतर. शुक्रवारी मध्यरात्री दोन हजार रुपयांच्या चाचण्या आणि औषधं खरेदी केली. यानंतर शनिवारी दुपारी पुन्हा दोन अडीच हजार रुपयांच्या चाचण्या आणि औषधं खरेदी केली असल्याची माहिती कामडी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT