Nagpur Mayo Hospital Not Used Funds: जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेला निधी वेळेत खर्च न झाल्याने यावर्षी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) ८२ लाख रुपये परत गेले असल्याची माहिती पुढे आली.
जिल्हा नियोजन समितीकडून यावर्षी ८२ लाखांचा निधी परत गेला. तर गतवर्षीदेखील मिळालेल्या एकूण निधीतून २ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात मेयो प्रशासनाला अपयश आले होते. यावर्षी विद्यमान अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी खरेदी प्रक्रियेला वेग दिला. मात्र तांत्रिक कारणांमुळे ८२ लाखांची खरेदी करण्यात यश आले नाही. यामुळे या ८२ लाखांवर पाणी फेरले गेले.
शासकीय रुग्णालयांमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी निधी दिला जातो. मार्चपूर्वी निधी खर्च करणे आवश्यक असते. जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या पावणे दहा कोटींमधून आवश्यक यंत्र सामग्री खरेदीच्या प्रक्रियेला वेग दिला. परंतु यातील ८२ लाखांच्या खरेदीतील निविदा प्रक्रिया वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळे हा निधी जिल्हाधिकारी यांना परत करावा लागला. या निधीतून मायक्रोस्कोप व काही यंत्र सामग्री खरेदी केली जाणार होते.
मेडिकलने केला १०० टक्के खर्च
यावर्षी जिल्हा नियोजन समितीकडून मेडिकलच्या तिजोरीत २१ कोटींचा निधी मिळाला. तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला २० कोटी मिळाले. वर्षभरात हा निधी खर्च करण्याचे आव्हान मेडिकल प्रशासनासमोर होते. हे आव्हान लिलया पेलवले असून हा सर्व निधी खर्च करण्यात मेडिकल प्रशासनाला यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.