Nagpur Mini Time Bomb on Gate: विठ्ठलवॉर्डातील मिनी बॉम्ब सदृश्य प्रकरणातील आरोपी देवेश हिंगवे याची येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश व्हि. आर. घारळ यांनी जामिनावर सुटका केली. येथील पोलिसांनी मात्र आरोपीची पोलिस कोठडी मिळविण्याकरिता जिल्हा सत्र न्यायालयाकडे धाव घेतली आहे.
विठ्ठल वॉर्डातील ज्ञानेश्वर कारमोरे यांच्या घरासमोरील फाटकावर प्लॅस्टिक थैलीमध्ये ठेवलेल्या मिनी बॉम्ब सदृश्य प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास केला. यात त्यांनी देवेश हिंगवे याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी (ता.२८) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश व्हि. आर. घारळ यांच्या समोर हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली.
या प्रकरणी निर्णय देताना त्यांनी स्फोटक पदार्थ अधिनियमामान्वये लावण्यात आलेले कलम कमी करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. न्यायालयीन कोठडीचे आदेश पारित होताच वकील ॲड. संजय तिरभाने, ॲड. अलका काळे, ॲड. हरीश कोडवाणी यांनी जामीन अर्ज दाखल करून जामीन मिळविला. (Latest Marathi News)
प्रकरणाचा सखोल तपास करण्याकरिता आरोपीची पोलिस कोठडी मिळविणे गरजेचे आहे. या करिता आम्ही जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल करून मागणी करणार आहोत.- अरविंद कतलाम, ठाणेदार आर्वी.
हा तर छोटा धमाका आहे. तुम्ही जर त्या मुली सोबत लग्न केल तर या पेक्षा मोठा धमाका होईल अशी धमकी अडकविलेल्या थैलीत लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या माध्यमातून दिली आहे. अशातच पोलिसांनी पकडलेला आरोपी सुद्धा जामिनावर सुटला आहे.- ज्ञानेश्वर कारमोरे, आर्वी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.