नागपूर : तहसील पोलिस हद्दीतील मोमीनपुरा परिसरात दुचाकीला कट लागल्याच्या वादातून एकाने पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. ही खळबळजनक घटना गुरुवारी (ता.२३) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूलही ताब्यात घेतले आहे.
रवी लांजेवार (वय ३८ रा. उमरेड रोड) आणि आनंद ठाकूर (वय २८, महात्मा फुलेनगर, मानेवाडा रोड) असे अटकेतील आरोपींची नावे असून प्रणय गणेश चांडक (वय २४ रा. टेकडी लाईन), चारुदत्त बुलबुले (वय ३० रा. सक्करदरा), विशाल विजय मेश्राम (रा. बापुकुटीनगर, पाचपावली) अशी फरार आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोमीनपुरा परिसरात एका टपरीवर रवी लांजेवार आणि आनंद ठाकूर यांच्यासह चौघेजण चहा पिण्यासाठी कारने आले होते.
मोमिनपुऱ्यात गोळीबार
दरम्यान रईस अख्तर हलिम यांच्या पानठेल्यासमोर कार पार्क करीत असताना, त्यांच्या कारने समोर असलेल्या शहाबुद्दीन रियाजुद्दीन उर्फ पापा यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यातून शहाबुद्दीन यांनी चालक आनंद ठाकूर याला मारहाण केली.
दरम्यान परिसरातील नागरिक एकत्रित झाल्याने चौघांनीही तिथून काढता पाय घेतला. यानंतर त्यांनी नंदनवन येथील एका बारमध्ये दारू प्यायली. तसेच झालेल्या प्रकाराचा बदला घेण्यासाठी चौघेही मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास पुन्हा त्या परिसरात आले. यावेळी दारूच्या नशेत पानठेलाचालक रईस अख्तर हलिमला जीवे मारण्याच्या प्रयत्न करीत, आनंद ठाकूर याने स्वतःजवळील पिस्तूल काढून एक फायर हवेत करीत, दुसरी गोळी रईसच्या दिशेने चालविली. मात्र,
अति दारू सेवनाने त्याचा नेम चुकल्याने रईस अख्तर हलिम थोडक्यात बचावला. हे बघताच, चौघेही कारमध्ये बसून पसार झाले. याची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी दाखल होत, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची माहिती घेतली. दरम्यान त्यातील रवि लांजेवार आणि आनंद ठाकूर यांना अटक केली असून त्यातून पिस्तूल आणि कार जप्त केली. मात्र, विशाल, चारुदत्त आणि प्रणय हे तिघेही अद्याप फरार आहेत.
शहाबुद्दीन ऐवजी रईसवर झाडली गोळी
आनंद ठाकूर आणि रवी यांच्यासह चौघे मोमीनपुऱ्यात गेल्यावर त्यांच्या कारने दुचाकीला कट मारल्यावरून दुचाकी मालक शहाबुद्दीन रियाजुद्दीन उर्फ पापा यांनी त्यांच्याशी वाद घालून मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. दरम्यान दारूच्या नशेत असलेले चौघेही परत तिथे आल्यावर त्यांनी रईसच शहाबुद्दीन असल्याचे मानून त्याच्यावर गोळीबार केला. दोन गोळ्या चालविल्यावर ते पसार झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.