Nagpur MSRTC  Esakal
नागपूर

MSRTC: राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकाला तीन महिन्यांची शिक्षा, 'या' आरोपांवर कामगार न्यायालयाचा निकाल

राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा येथील विभाग नियंत्रक संदीप शरद रायलवार यांना कामगार न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Akola MSRTC Officer Arrested: राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा येथील विभाग नियंत्रक संदीप शरद रायलवार यांना कामगार न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. रायलवार हे बुलढाणा येथे विभाग नियंत्रक म्हणून कार्यरत असताना एका कर्मचाऱ्यांच्या बडतर्फी प्रकरणात त्यांनी केलेल्या हलगर्जी आणि न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याविषयीचा निकाल विद्यमान कामगार न्यायालयाचे न्यायाधीश ए. जी. मगरे यांनी दिला आहे.

संदीप रायलवार हे बुलढाणा येथे विभाग नियंत्रक म्हणून कार्यरत असताना २०१३ मध्ये तेथे एसटी महामंडळातील ड्रायव्हर भाऊराव शिरसाट यांना बडतर्फ करण्यात आले होते. तदनंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात कामगार न्यायालयात नंदा शिरसाट यांनी त्यांचे वारस म्हणून पुढे ही केस लढवली. (Latest Marathi News)

यात कामगार न्यायालयाने १२ नोव्हेंबर २०२१ रोजी तांत्रिकदृष्ट्या (निधनामुळे) भाऊराव शिरसाट यांना कामावर घेत त्यांच्या नोकरीतील सातत्य ठेवत, मागील वेतन त्याचबरोबर निवृत्तीवेतन देण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला होता.

राज्य परिवहन महामंडळ या प्रकरणात औद्योगिक न्यायालयात गेले होते. तेथे देखील त्यांचा पराभव झाला. कामगार न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी वारस नंदा शिरसाट यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर कामगार न्यायालयाने संदीप रायलवार यांना तीन महिन्यांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी एकत्रित शिक्षा सुनावली आहे.

त्यांना या प्रकरणात केव्हाही अटक या प्रकरणात आता होऊ शकते. नंदा शिरसाट यांच्या वतीने ॲड. प्रमोद वर्मा, तर विभाग नियंत्रकांच्या वतीने ॲड. एस. एल. राखोंडे यांनी कामकाज पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT