Nagpur Municipal Corporation Election ward structure announced corporators all happy sakal
नागपूर

Nagpur Municipal Corporation | ठरलं आता कुठून लढायचं ते...

नवी प्रभाग रचना जाहीर : आजी-माजी नगरसेवकांसह सर्वच खुश

सकाळ वृत्तसेवा

ठरलं आता कुठून लढायचं ते...

नवी प्रभाग रचना जाहीर : आजी-माजी नगरसेवकांसह सर्वच खुश

नागपूर : सुमारे दोन महिन्यांपासून प्रभाग रचनेची प्रतीक्षा करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांची उत्सुकता आज संपली. निवडणूक आयोगाने शहरातील ५२ प्रभागांची रचना जाहीर केली असून आता सर्वांचे लक्ष आरक्षणाकडे लागले आहे. नव्या रचनेत फारशी तोडफोड करण्यात आलेली नाही. तसेच जुन्या प्रभागांचा समावेश करण्यात आला असल्याने आजी-माजी नगरसेवक खुश झाले आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार असल्याने मागील निवडणुकीत भाजपच्या कार्यकाळात झालेली रचना विस्कळीत केली जाईल, मोठी तोडफोड केली जाईल, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, चारदोन प्रभागांचा अपवाद वगळता फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही. यापूर्वीच्या तीनच्या प्रभागाची रचना जवळपास कायम असल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. चारऐवजी तीनचा प्रभाग करायचा असल्याने फारशी तोडफोड करण्यास संधीसुद्धा नव्हती. नव्याने झालेल्या प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसलाही विजयाची समान संधी उपलब्ध राहील असा अंदाज वर्तविला जात आहे.

७ नगरसेवक वाढणार

आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. एका प्रभागात जास्तीत जास्त ५१ हजार तर कमितकमी ४२ हजार लोकसंख्या ठेवण्यात आली आहे. थोडेफार क्षेत्रफळ वाढवण्यात आल्याने नगरसेवकांच्या संख्येत सातने भर पडणार आहे. यापूर्वी १५१ नगरसेवक होते. आता त्यांची संख्या १५६ होणार आहे.

ओबीसी आरक्षणाकडे लक्ष

प्रभागांची रचना करताना सामजिक विचार केला असल्याचे दिसून येते. अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक समाजाच्या लोकसंख्या अधिक असणाऱ्या वस्त्यांना एकत्र करण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे अल्पसंख्यांक नगरसेवकांची संख्या यंदाच्या निवडणुकीत वाढणार असल्याचे दिसून येते. प्रभागाची रचना करताना २०११च्या लोकसंख्येचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार १२ प्रभागांमध्ये ३१ जागा एससी, ८ प्रभागांमध्ये १२ जागा एसटी राखीव राहतील. एकूण १५६ पैकी ७८ जागा महिलांसाठी राखीव राहणार असल्याचे समजते. शहरातील एकूण १७ प्रभागांमध्ये महिला आरक्षण वगळता सर्वांसाठी खुले राहणार आहे. ओबीसी आराक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आरक्षणाच्या सोडतीपूर्वी निकाल जाहीर झाला तर यात फेरबदल होण्याची शक्यता आहे.

महापौर सर्वाधिक सुरक्षित

विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांचा प्रभाग भाजपसाठी एकदम सुरक्षित झाला आहे. त्यांच्या प्रभागाच्या सभोवताल असलेल्या मुस्लिम वस्त्या त्यांच्या जुन्या प्रभागातून वगळण्यात आल्या आहेत. नव्या रचनेत मुस्लिम वस्त्या वेगळ्या प्रभागात जवळपास एकत्रित केल्या आहेत. त्यामुळे येथील भाजपचे टेंशन जवळपास संपले आहे.

आभा पांडे यांना टेंशन

चारच्या प्रभागात शहरातून एकमेव निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांच्या प्रभागाचे जवळपास दोन तुकडे झाले आहे आहेत. त्यामुळे त्यांचे टेंशन वाढले आहे. अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्या प्रदेश सरचिटणीस आहेत. राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदीसुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत असल्याने यावेळी त्यांना निवडणूक लढताना दोन उमेदवारांची सोबत राहणार हा त्यांच्यासाठी दिलासा ठरू शकतो.

सर्वात मोठा प्रभाग २५

शहरातील सर्वात मोठा प्रभाग २५ क्रमांकाचा राहणार आहे. येथील एकूण लोकसंख्या ५१ हजार ३३६ इतकी आहे. यात ५ हजार ८१७ अनुसुचित जाती, अनुसूचित जमातीचे ११ हजार ८२८ मते आहेत. या प्रभागात इतवारी, कुंभारपुरा, जुनी मंगळवारी, आयचित मंदिर, भुतेश्वर नगर, गंगाबाई घाट या वस्त्यांचा समावेश आहे.

सर्वात लहान प्रभाग ४७

सर्वात लहान प्रभाग ४७ क्रमांकाचा आहे. येथील लोकसंख्या ४२ हजार ८३३ लोकसंख्या, असुसूचित जाती ३ हजार ४१० व अनुसूचित जमातीची एक हजार ९१७ इतकी लोकसंख्या आहे. या प्रभागात जंबुदीपनगर, महालक्ष्मीनगर, अयोध्यानगर, बीडीठेप, न्यू सुभेदारनगर या प्रमुख वस्त्यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT