नागपूर : कोरोनाच्या वर्गवारीतील डेल्टा प्लसच्या (delta plus variant of corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिकेने (nagpur municipal corporation) शहरात सोमवारपासून निर्बंध आणखी कठोर करीत लग्न समारंभासाठी केवळ १०० जणांना परवानगी दिली. महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना आज उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाईचा धक्का दिला. चार लग्न समारंभांवर कारवाई करीत ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. (nagpur municipal corporation fine on people who violate corona rules)
लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात कोविड नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने लग्नसमारंभांवर लक्ष केंद्रित केले. नंदनवन येथे मास्क न घातलेल्या नवरदेवाला दंड ठोठावला होता. त्यानंतर आजपासून नव्या कठोर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चार मंगल कार्यालयातील लग्न समारंभात महापालिकेचे उपद्रव शोधपथक धडकले. धंतोली झोनंतर्गत सुयोगनगरातील रंजना सेलिब्रेशन हॉल, चिचभवन येथे मनोज बोबडे यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात १०० पेक्षा जास्त पाहुणे आढळून आले. हनुमाननगर झोनंतर्गत मार्कंडेय सभागृह, नेहरूनगर झोनमधील कारवाईत कडबी चौकातील चामट सभागृहातही परवानगीपेक्षा जास्त पाहुणे आढळले. या तिन्ही झोनच्या उपद्रव शोधपथकांनी सभागृह संचालक तसेच घरमालकावर प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावला. विशेष म्हणजे रंजना सेलिब्रेशन हॉलमध्ये सभागृह संचालक व कुटुंबप्रमुख या दोघांवरही प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
७० मंगल कार्यालयांची तपासणी -
उपद्रव शोधपथकाने आज ७० मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोधपथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे संपूर्ण शहरातील मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.