नागपूर पालिकेत स्टेशनरी घोटाळा eSakal
नागपूर

मनपा स्टेशनरी घोटाळा | अधिकाऱ्यांकडून समितीपुढे उडवाउडवीची उत्तरे

अध्यक्ष संतापले : चौकशी ठरली वादळी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेतील स्टेशन घोटाळा चौकशी समितीपुढे अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावर समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यामुळे चौकशी समितीची बैठक चांगलीच वादळी झाली.

स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून काल, गुरुवारी या घोटाळ्याच्या चौकशी समितीपुढे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, मुख्य अभियंता खवले, उपायुक्त मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आदी अधिकारी हजर झाले होते. या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच आयुक्तांनी गठित केलेल्या समितीपुढे घोटाळ्यासंदर्भात साक्ष नोंदविली असून त्यावर ठाम असल्याचे सांगितले. याबाबतचा अहवाल आज समितीकडे देण्यासाठी चौकशी समितीची बैठक पार पडली.

बैठकीत समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना विचारपूस केली. यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एका अधिकाऱ्यांनी आपला तोरा दाखवीत इंग्रजीत संभाषण सुरू केले. ठाकरे यांनीही त्यांच्याच भाषेत त्यांना सुनावले. एवढेच नव्हे तर ठाकरे यांनी या अधिकाऱ्यांना संविधानाची जाणीव करून देत सभागृहाने गठित केलेल्या समितीपुढे तुम्ही बसले आहेत, असे सांगितले. एकूणच चौकशी समितीची आज झालेली बैठक चांगलीच वादळी ठरली.

प्रशासनाने सोपवला अहवाल

स्टेशनरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना यांच्या नेतृत्वात समिती गठित केली होती. या समितीने अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली होती. त्यानंतर सभागृहात महापौरांनी अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वात समिती गठित केली. ठाकरे समिती या घोटाळ्याची चौकशी करीत असून आज अतिरिक्त आयुक्त मीना यांनी त्यांनी नोंदविलेल्या साक्षी व इतर कागदपत्रांचा अहवाल ठाकरे यांच्याकडे सोपवला.

अहवाल शंभर पानांचा

प्रशासनाने गठित केलेल्या समितीचा अहवाल आज दिला असून सोमवारी या अहवालाची पाहणी केली जाईल, असे चौकशी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी सांगितले. प्रशासनाच्या समितीने १०० पानांचा अहवाल तयार केला. यातील १३ पानांमध्ये चौकशीसंबंधी माहिती देण्यात आली आहे तर इतर पानांमध्ये कागदपत्रे आदी आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT