नागपूर महापालिका निवडणुक sakal
नागपूर

नागपूर महापालिका निवडणुक | तुम्हीच सांगा, पुन्हा तिकीट द्यायचे की नाही?

भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांना विचारणा : अनेक नगरसेवक धास्तावले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत निष्क्रिय नगरसेवक आणि जनतेमधील असंतोषाचा फटका बसण्याचा धोका दिसत असल्याने भाजपने आता कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना ‘तुम्हीच सांगा, तुमच्या नगरसेवकाला पुन्हा तिकीट द्यायचे की नाही’ अशी विचारणा सुरू केली आहे. त्यामुळे अनेक निष्क्रिय नगरसेवक चांगलेच धास्तावले आहेत.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये नगरसेवकांना प्रवेश नाही. प्रत्येक प्रभागातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून बैठका घेतल्या जात आहेत. ‘तुमच्या नगरसेवकाच्या पाच वर्षांच्या कामगिरीबाबत आपण समाधानी आहेत की नाही, पुन्हा त्यालाच तिकीट द्यायची की नाही, तसेच नसेल उमेदवारी द्यायची असेल तर नावांचा पर्याय सांगा’ अशी विचारणा केली जात आहे. त्यामुळे अनेक नगरसेवक धास्तावले आहेत. पाच वर्षे नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात नसलेल्या नगरसेवकांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विशेष म्हणजे भाजपने यापूर्वीच अनेक नगरसेवकांना तिकीट कापण्याचा इशारा दिला आहे. जवळपास ३० टक्के उमेदवार बदलण्यात येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत धोका होऊ नये याकरिता भाजपच्या नेत्यांनी काही दिवस भाषा सौम्य केली होती. जो जनतेत त्यालाच उमेदवारी असे सांगणे सुरू केले होते. मात्र, आता पक्षस्तरावर खासगी एजंसीमार्फत सर्व्हे केला जाणार आहे. तत्पूर्वी विधानसभानिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले जात आहे. बैठकांमधून केली जात असलेली विचारणा हासुद्धा सर्व्हेचाच भाग असल्याचे समजते.

समर्थकांमुळे अडचण

बैठकीला संबंधित मतदारासंघ व प्रभागातील पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचे समर्थकही मोठया प्रमाणात उपस्थित होते. समर्थकांनी विद्यमान नगरसेवकाच्या कामाची प्रशंसा केली. पुन्हा त्यालाच तिकीट देण्याची मागणी केली. त्यामुळे अशा बैठकांमधून कितपत अचूक माहिती गोळा होईल, यविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

प्रयोग चांगला पण...

पराभवाच्या भीतीने का होईल आमचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. नेत्यांचा जवळचा व मागेपुढे फिरणारा म्हणून कोणालाही यापुढे तिकीट दिले जाणार नाही, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. ही चांगली सुरुवात आहे. प्रामाणिक कार्यकर्त्यांची दखल घेतल्या जात आहे. तसेच निष्क्रिय नगरसेवकांना घरी बसवले जाणार असेल तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT