Nagpur Municipal Corporation sakal
नागपूर

Nagpur : महानगरपालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू

कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजपचे संकेत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शिवसेना व धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर भाजपचा नागपूर शहरात सुरू असलेला कार्यक्रमांचा धडाका पाहता मनपा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उद्‍घाटन, भूमिपूजन, लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातून निवडणुकीचा माहोल तयार करण्याची भाजपची पद्धत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त गल्लीबोळात झालेल्या जेवणावळी आणि महाप्रसादाचे बहुतांशी कार्यक्रम पुरस्कृत होते.

इतक्या मोठ्या प्रमाणात जेवणावळीचे कार्यक्रम यापूर्वी होत नव्हते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकसभा कायम राखायची आहे. महापालिका हातून गेली तर जिंकणे सोपे राहणार नाही, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे राज्यातील गोंधळाकडे त्यांनी दुर्लक्ष करून आपल्या कार्यक्रमांचा धडाका सुरू ठेवला.

सांस्कृतिक, क्रीडा, ज्येष्ठांसाठी सांस्कृतिक महोत्सव घेतले. दिव्यांग पार्कचे भूमिपजून करून दक्षिण नागपूरमध्ये दिव्यांगांसाठी स्टेडियम उभारण्याची त्यांनी घोषणा केली. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असल्याने भरघोस निधी शहरात ओतला जात आहे.

जी-२० परिषदेचा माध्यमातून विकास कमे व शहराच्या सौंदर्यीकरणात भर घातली जात आहे. ही सर्व मशागत महापालिका निवडणुकीसाठी केली जात आहे. हे बघता येत्या दोन ते तीन महिन्यांत महापालिकेची निवडणूक जाहीर होऊ शकते, असे मनपाच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

भाजपला मुंबई आणि नागपूर महापालिका कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहे. मुंबईसाठी शिवसेनेचा मोठा अडथळा दूर करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला.

फाटाफुटीची शक्यता

सत्ता संघर्षावर तडकाफडकी निर्णय होण्याची शक्यता कमीच दिसते. अशा परिस्थिती मनपा निवडणूक जाहीर झाल्यास महाविकास आघाडीतही फाटाफूट होण्याची अधिक शक्यता आहे. शिक्षक व पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमध्ये मोठे मतभेद उफाळून आले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ते कायम रहिले तर वादही कायमच राहणार आहेत. काँग्रेसमधील तिकीट वाटपाच्या वेळी होणारी ओढाताण आणि मतभेद सर्वांनीच जवळून पाहिले. नेत्यांमधील संबंध अद्याप ताणलेले आहेत. हे बघता तिकीट वाटपात काही सुधारणा होईल असे दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT