स्त्री रुग्णालयात sakal
नागपूर

Nagpur : मनपाच्या स्त्री रुग्णालयात ‘दिव्य’दर्शन!

ना डॉक्टर ना साधनसामुग्री, कर्मचारी करतात आराम

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पाचपावली येथील मनपाच्या ‘स्त्री रुग्णालयात’आल्यानंतर खऱ्या अर्थाने तेथील स्थितीचे ‘दिव्य’दर्शन घडून धक्काच बसला. रविवारी (ता.२६) सकाळी येथे भेट दिल्यावर रिकाम्या २० खाटा दिसल्या. एकाही खाटेवर रुग्ण नसल्याने कर्मचाऱ्यांनी हे रुग्णालय चक्क ‘विश्रामगृह’ केल्याचे चित्र होते.

रविवारी हे रुग्णालय जणू सुटीवर गेले. सर्व रुग्णांना सुटी दिली असावी असे चित्र होते. रविवारी डॉक्‍टर येत नाहीत. एक परिचारिका आणि एक सफाई कामगार आणि एक सुरक्षारक्षक एवढेच मनुष्यबळ येथे होते. मात्र आपात स्थितीसाठी १०८ क्रमांकाची मोबाईल रुग्णवाहिका येथे होती. तिचा वापर किती होतो, हे कळायला मार्ग नाही, मात्र चालक एका हातात मोबाईल घेऊन खोलीत आराम करीत होता.

उत्तर नागपुरात साडेपाच ते सहा लाख लोकसंख्या असून ८० च्यावर झोपडपट्ट्या आहेत. मात्र या झोपड्यांतील महिलाही या सुतिकागृहात येत नाहीत, यावरून येथील उपचाराचा दर्जा लक्षात येतो. विशेष म्हणजे, या भागात एकमेव स्त्री रुग्णालय आले. येथे दर्जेदार सुविधा दिल्यास, अद्ययावत यंत्रसामुग्री व तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केल्यास मेयो, डागा आणि मेडिकलवरील प्रसूतीचा भार घटू शकतो. मात्र दर्जा उंचावण्यात महापालिकेलाच रस नाही. परिणामी रुग्णालय ओस पडले आहे.

कोरोना काळात लावलेला ऑक्सिजन प्लान्ट मात्र येथे दिमाखात उभा आहे. पण त्याचा वापरही होत नाही. येथे बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, क्ष-किरणतज्ज्ञ, सोनोग्राफी यंत्र नाही. रुग्ण कधी येतील याचा

मनपाच्या स्त्री रुग्णालयात ‘दिव्य’दर्शन!

याचा नेम नसल्याने येथे मनुष्यबळ तैनात असते. प्रत्यक्षात विचारणा केल्यास रुग्ण दाखल करण्यासाठी येथील डॉक्टरांकडून पुढाकार घेतला जात नसल्याचे समजले. सोमवार ते शनिवारी बाह्यरुग्ण विभाग असतो. रविवारी (ता.२६) सकाळी ऑटोक्लेव्ह करीत होती. दोन तासांच्या ओपीडीत केवळ पंधरा रुग्ण हजेरीसाठी येतात.

दहा खाटांच्या या रुग्णालयात कधी-काळी २६ पदे मंजूर होती. निवृत्तीनंतर ही पदे भरण्यासंदर्भात महापालिकेने पुढाकार घेतला नाही. कोविड काळात येथे खाटांची संख्या वाढली. मात्र दर्जा वाढवण्यासंदर्भात पुढाकार न घेतल्याने रुग्णालयावर अवकळा पसरली आहे. येथे प्रवेश केल्यानंतर रिकाम्या खुर्चीचे पहिले दर्शन होते. सध्या आठ परिचारिका आहेत. मात्र रविवारी एकच परिचारिका तैनात होती. रुग्णच नसल्यामुळे येथे झोपेचा आनंद सहज घेता येतो.रुग्ण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना आराम करण्याशिवाय काम नाही. परिणामी हे ‘विश्रामगृच'' बनले आहे.

रुग्णालय परिसरात कचरागाडीचे यार्ड

पाचपावली सुतिकागृहाच्या गेटवर सुरक्षा रक्षकासाठी उभारलेली खोली सुसज्ज दिसते. मात्र येथे सुरक्षारक्षक दिसत नाही. उकाड्यात समोर गार्डला बसावे लागते. येथे एकच गार्ड तैनात असतो. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून येथे महापालिकेच्या कचरागाडी ठेवण्यासाठी असलेले हे यार्ड असल्याचे दिसते. येथे महिलांच्या कुटुंब नियोजनाच्या व पुरुष नसबंदीच्या शस्त्रक्रिया होतात. मात्र सहसा पुरुष येत नसल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT