election  sakal
नागपूर

Nagpur News : काँग्रेसच्या गोटात वातावरण थंड, भाजप कार्यकर्त्यांत उत्साह; ३१ सरपंच पदांकरिता ११२ उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा

कोदामेंढी - तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पाच नोव्हेंबरला ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सरपंच पदाची निवड थेट जनतेतून असल्याने हौसे गौसे नशीब अजमावण्याच्या तयारीला लागले. तालुक्यात ३१ गट ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून ३१ सरपंच पदाकरिता ११२ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून गावगाड्यात वैयक्तिक संबंधानुसार पॅनेल तयार करण्यात आले आहेत. ३१ ग्रामपंचायतीमध्ये ९५ वॉर्ड (प्रभाग) असून जवळपास २५४ सदस्य पदांकरिता ६२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नामनिर्देशन अर्जाची छाननी सोमवारला होणार असून अर्ज परत घेण्याची अंतिम मुदत बुधवार आहे.

त्यानंतरच किती इच्छुक उमेदवार रिंगणात दम ठोकून राहतात हे कळेल. निवडणुकीचा माहौल रंगात येत असून पॅनेलचा प्रमुख आणि कार्यकर्ते आपसांत बैठका घेऊन निवडणुकीची रणनीती आखू लागले आहेत. आपणच निवडून येणार, या आशेवर सगळेच कामाला लागले आहेत. सरपंच पदाचा उमेदवार पॅनेलचा प्रमुख असल्याचे बऱ्याच ठिकाणचे वास्तव चित्र पाहायला मिळत आहे.

ज्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण, आणि नामाप्र. (पुरुष, स्त्री) आहेत, अशा ठिकाणी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत हे विशेष. पिपरी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण ओबीसीसाठी राखीव असल्याने येथे सर्वाधिक नऊ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर लापका येथून सात, धामणगाव सहा तर गांगणेर, नानादेवी, सालवा आणि बेरडेपार येथून प्रत्येकी पाच सरपंच पदांकरिता अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

मराठी फॉन्टची समस्या

कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे ऑनलाइन अर्ज दाखल करताना मराठीच्या कॉलममध्ये ऑटोमॅटिक मराठी नाव घेतल्या जाते. मात्र निवडणूक आयोगाच्या या वेबसाइटवर उमेदवाराचे मराठी नाव कॉपी पेस्ट करून टाकावे लागत असल्याची चिंताजनक बाब आहे. यात निवडणूक आयोगाने सुधारणा करणे गरजेचे आहे.

काँग्रेसचा नाही कुणी वाली

तालुक्यात भाजपचे आमदार असले तरी जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक तीन प्रतिनिधी आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या ग्रा. पं. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप सर्वाधिक कल दिसून येत आहे. कॉँग्रेसचे नेते, पदाधिकारी यांची चुप्पी कार्यकर्त्यांसाठी निराशजनक दिसून येत आहे. एकेकाळी इंदोरा काँग्रेसचा गढ समजला जात होता. मात्र सध्या होत असलेल्या निवडणुकीत जे काँग्रेसचा पंजा हातात घेऊन फिरत होते, त्यांनी भाजपचे फूल हातात धरला. त्यामुळे येथे भाजप विरुद्ध भाजप असेच समीकरण राहणार का? असा सवाल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT