नागपूर - वाडी परिसरात एका महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या इसमाने तिच्या चार वर्षीय मुलास सिगारेटचे चटके देत छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी त्यांच्या आजीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५) कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत पित्याला अटक केली.
संकेत उत्तरवार (वय ३२) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो खासगी कंपनीत काम करतो. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकल्याच्या वडिलांनी सहा महिन्यांपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर पीडित आणि त्याचा पाच वर्षाचा मोठा भाऊ हे दोघेही आजीकडे राहत होते.
घरचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी आईने मानेवाडा येथील एका खासगी कंपनीत काम सुरू केले. तिथे तिची संकेत उत्तरवार याच्याशी भेट झाली. दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले. त्यातून त्यांनी २० दिवसांपूर्वी लिव्ह-इनमध्ये राहण्यास सुरुवात केली. दरम्यान दोघे भाऊ त्यांच्यासोबत राहण्यासाठी गेले. ते संकेतला पप्पा म्हणायला लागले. मात्र, संकेत मनातून त्यांचा राग करायचा.
‘लिव्ह-इन’मधील पप्पा द्यायचा चिमुकल्याला सिगारेटचे चटकेत्यातून तो दोघांनाही मारहाण करायचा आणि लहान मुलाला सिगारेटचे चटके द्यायचा. दरम्यान एक दिवस मुलांचे नातेवाईक दोघांनाही भेटण्यासाठी घरी गेले असता त्यांना चिमुकल्याच्या चेहऱ्यावर, पोटावर व पाठीवर चटक्यांचे डाग दिसले. त्यांनी विचारणा केली असता, पप्पा म्हणजेच संकेतने त्यांना सिगारेटचे चटके दिल्याची माहिती समोर आली.
ही माहिती नातेवाईकांनी मुलांच्या आजीला दिली. आजीने नातवाची तत्काळ भेट घेत, त्याला विचारणा केली. त्यावेळीही त्याने संकेतने चटके दिल्याचा खुलासा केला. त्यावरून आजीने थेट वाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशी करीत, गुन्हा दाखल करून संकेत उत्तरवारला शनिवारी अटक केली. सोमवारी न्यायालयासमोर सादर करीत, दोन दिवसांची कोठडी मिळविली.
आईला कसे कळले नाही?
मुलांना दररोज मारहाण करीत लहान्याला सिगारेटचे चटके दिले जात असताना, त्यांच्या आईला याबाबत काहीच कसे का कळले नाही? हा प्रश्न निर्माण होतो. एकाच भेटीत नातेवाईकांना ते कळले. त्यातून आजीला माहिती मिळाली. त्यांनी जाऊन पीडित मुलांना विचारणा केली. मात्र, घरात राहणाऱ्या आईला याची माहिती नव्हती हे कळायला मार्ग नाही.
स्वतःची मुले नसल्याने संकेत करायचा द्वेष
लिव्ह-इन मध्ये असलेल्या संकेतला मुलाची आस होती. मात्र, पत्नीला अगोदरच दोन मुले असल्याने त्याला ही आशा कमीच होती. त्यात मुलगा व त्याचा भाऊ संकेतला पप्पा म्हणायला लागले. त्यामुळे त्याला चिड यायची.
त्यामुळे तो संपूर्ण राग दोघांवरही काढायचा. त्यासाठी तो नेहमी त्यांचा छळ करू लागला. चिमुकल्याला सिगारेटचे चटके देऊ लागला. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केल्यावर ते अभ्यास करीत नसल्याने त्यांना मारहाण करीत चटके दिल्याचे त्याने सांगितले..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.