Nagpur News Sakal
नागपूर

Nagpur News : पोषण आहार धान्यविक्रीच्या आरोपींवर मोक्का?

पोलिसांची तयारी सुरू ; सहा जण ताब्यात; इतरांवरही कारवाईची तयारी

मंगेश गोमासे : @mangeshG_sakal

नागपूर : महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये पोषण आहाराचे धान्य विकणाऱ्या सुसंस्कार महिला बचतगटाच्या चंद्रशेखर भिसीकरसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सहाही जणांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची तयारी केली.

पोलिसांनी अहफाज पठाण वल्द अशफाक पठाण (वय २२, रा. खरबी), चंद्रशेखर प्रभाकर भिसीकर(वय ४५, रा. तांडापेठ), अमोल भिसीकर, सोनू शमी पठाण, मोनू शमी पठाण, सतीश निर्मलकर यांना अटक केली. ११ ऑक्टोबरला चारचाकी वाहनातून तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतून यशोधरानगर येथे अवैधरीत्या तांदूळ विक्रीसाठी जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी सापळा रचून वाहन अडवीत चालकाला पकडले.

यावेळी वाहनात दोन टन तांदळाची पोती असल्याचे आढळून आले. त्यात पोलिसांनी सारा आणि सिया ट्रेडर्सच्या गोदामाची तपासणी करीत महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली. याशिवाय चंद्रशेखर भिसीकरचा भाऊ अमोल भिसीकर याच्यासह चंद्रशेखरकडून धान्याची खरेदी करणाऱ्या सतीश निर्मलकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या तपासणीत या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी सहाही जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू केली. येत्या काही दिवसांत तहसील पोलिसांमार्फत मोक्का लावण्याची शक्यता असून, तसा अहवाल पोलिस आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे कळते.

इतर संस्थाही लवकरच रडारवर

केंद्रीयकृत आहाराच्या वाटपात असलेल्या संस्थांनीही बरीच बनावट कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेला पोलिसांनी पत्र दिले. मात्र, जिल्हा परिषद आणि महापालिकेद्वारे याबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने इतर संस्थांची तपासणी करण्यात पोलिसांना अडचण येत असल्याचे दिसून येते.

अधिकारी दबावात?

पोषण आहार मिळविणारे बहुतांश बचतगट एका विशिष्ट राजकीय पक्षाशी निगडित आहेत. त्याच्या वरदहस्तानेच हे कंत्राट त्यांना मिळाले. त्यामुळे याबाबत महापालिका आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांवर त्यांच्या चौकशीसंदर्भात कुठलीच कारवाई होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे इतर बचतगटांची चौकशी थंडबस्त्यात पडल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT