the heart sakal
नागपूर

Nagpur News : बंद पडलेले हृदयाचे ठोके ४५ मिनिटांनंतर झाले सुरू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - उपराजधानीतील चाळीशीतील व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. हृदयाचे ठोके बंद पडले. डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नातून ४५ मिनिटांनंतर बंद पडलेले हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले आणि त्याचा जीव वाचला.

दीड महिन्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तेव्हा दोन्ही हात जोडून त्याने व त्याच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना देवदूत असल्याचे सांगत त्यांचे आभार मानले.

क्रिम किंग्जवे रुग्णालयात डॉ. ऋषी लोहिया यांनी सदर रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. रुग्णाचे वय कमी होते, यामुळे व्हेंट्रिव्हें ट्रिक्युलर फायब्रिलेशन मॉनिटरवर दिसल्यानंतर त्यांनी ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ सीपीआर करण्याचा निर्णय घेतला. चाळीस मिनिटांनंतर ह्रदयाचे ठोके पुन्हा सुरू होईपर्यंत त्यांची ही प्रक्रिया सुरू होती.

अमेरिकन हर्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, एखाद्या ह्रदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला जास्तीत जास्त ४० मिनिटे सीपीआर देऊन प्रयत्न केले जातात. या काळात रक्ताभिसरण किंवा ह्रदयाचे ठोके सुरू न झाल्यास सीपीआर थांबवण्यात येतो. मात्र, डॉ. लोहियांनी ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ सीपीआर सुरू ठेवल्याने रुग्ण वाचला.

घरी जाताना आले डोळ्यात पाणी...

ज्या रुग्णाचा जीव वाचला, तो रुग्ण आयटी कंपनीत नोकरीला आहे. २५ ऑगस्ट रोजी क्रिम्स किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सीपीआरनंतरही त्यांच्या हृदयाचे ठोके सुरु झाले, परंतु ३ ते ४ दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर, तब्बल ४० दिवस व्हेंटीलेटरवर होते. नेफ्रोलॉजिस्ट डॉ अश्विनी खांडेकर आणि सर्जन डॉ. सुरजीत हाजरा यांच्यासह अनेकांच्या प्रयत्नातून या रुग्णाचा जीव वाचला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT