Friendship And love Sakal
नागपूर

प्रेमाचे अनोखे बंधन! दोन मैत्रिणी लवकरच बांधणार लगीन गाठ!

अनिल कांबळे

नागपूर : प्रेमाला जात-पात-धर्माच्या मर्यादा नाही, असे म्हटले जाते. परंतु एकविसाव्या शतकामध्ये प्रेमाचे याही पलीकडले उदाहरण समोर आले आहे. नागपूरकरांनी नुकतेच अशाच अनोख्या प्रेमबंधाचा अनुभव घेतला. जिवापाड प्रेम करणाऱ्या दोन मैत्रिणी (To Girls Love Together) आयुष्यभरासाठी बंधनामध्ये अडकणार आहेत. नागपूरमधील एका छोट्या रिसॉर्टमध्ये छोटेखानी समारंभात त्यांनी साक्षगंध उरकले.

नागपूर येथील डॉ. रिया व कोलकत्ता येथील जिया (दोन्ही काल्पनिक नाव) उच्चशिक्षित असून त्यांची नागपूर येथील एका परिषदेत भेट झाली. डॉ. रिया मानसोपचारतज्ज्ञ आहे. तर, जिया एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये असून, ती दिल्ली येथे नोकरी करते. प्रथम भेटीमध्ये ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. वर्षभर मैत्री निभावल्यानंतर आपल्यात एक अनोखे नाते असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमविवाह म्हटले की, अनेक स्तरावर आजही विरोध होतो, अशात लेसबीयन तरुणींच्या या अनोख्या नात्याला विरोध नसता झाला तर नवलच.

मात्र, रिया व जिया या दोघींचे कुटुंबीय उच्चभ्रू, समंजस आणि उच्चशिक्षित असल्याने त्यांनी या नात्याचा अखेर स्वीकार केला. दोन्ही कुटुंबीयांनी नागपूरमध्ये साक्षगंध करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे २९ तारीख निश्‍चित करण्यात आली. काही मोजके नातेवाईक, एलजीबीटी (LGBT)(लेस्बियन, गे, बायो, ट्रान्सजेंडर) समूहातील सदस्य अशा दीडशे लोकांच्या उपस्थितीमध्ये हा अनोखा सोहळा पार पडला.

कोरोनाची स्थिती वर्षभरात सुस्थितीत आल्यानंतर थाटात लग्नसोहळा करू, असा मानस रिया, जिया तसेच कुटुंबीयांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, मुंबई किंवा गोवा येथील समुद्र किनारी आपले लग्न व्हावे, अशी इच्छा या दोघींनी व्यक्त केली. गेल्या काही काळापासून एलजीबीटी समुदायाचे अस्तित्व मोकळ्या मनाने स्वीकारण्याबाबत समाजाचा कल वाढताना दिसतो आहे. नागपुरातील मायरा गुप्ता ट्रान्सजेंडर असून, देशातील पहिली ट्रान्सजेंडर नर्स म्हणून ओळखली जाते. तर, भावेश जैन ट्रान्सजेंडर डॉक्टरकीच्या पेशात आहे. अशातच नागपुरात झालेला साक्षगंध सोहळा या समुदायाने अजून एक मोठे क्रांतिकारी पाऊल टाकल्याची साक्ष देणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: रोहित पाटील-संजयकाका पाटील एकाच वेळी आले समोरासमोर

Nashik News : ‘घाबरू नको बाळा, मतदान होईपर्यंत मला काहीच होणार नाही’; आईच्या निधनानंतर 24 तासांत नायब तहसीलदार पुन्हा कर्तव्यावर

Sameer Bhujbal vs Suhas Kande: तुझा मर्डर आज फिक्स...सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

Mumbai Voting: मतदानाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आज मध्यरात्रीपर्यंत धावणार

Supriya Sule: ऑडिओ क्लिप प्रकरण; ते सांगतील त्या ठिकाणी येऊन उत्तर देण्याची माझी तयारी, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT