nagpur  sakal
नागपूर

Nagpur News : उपराजधानी पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर!

व्हीएनआयटीच्या माजी विद्यार्थ्याला दिल्लीतून अटक; तपास यंत्रणांवर प्रश्‍नचिन्ह

मंगेश गोमासे

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले नागपूर नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे अनेकदा दिसून आले. आता पुन्हा एकदा उपराजधानीला दहशतवादी लक्ष्य करण्याची शक्यता बळावली आहे.

येत्या काळात द्वेषभावनेतून मोठ्या कारवाया घडविण्याच्या अनुषंगाने दहशतवादी संघटना सक्रीय झाल्याचे चित्र आहे. ४ दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेला शाहनवाज उर्फ ​​शफी उजमाने व्हीएनआयटीतून मायनिंग इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या अटकेमुळे नागपूर पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची शक्यता बळावली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) वेळोवेळी नागपूर सभा घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, याकडे सुरक्षा यंत्रणा याकडे लक्ष देत नसून अशा कारवायांचा शोध घेण्यात ना एटीएस, ना आयबी, ना शहर पोलिसांचा गुप्तचर विभागाला रस आहे. शाहनवाज २०१५ ते २०१९ दरम्यान नागपुरात शिकत होता आणि वसतिगृहात राहत होता.

२०१८ मध्ये तो रतलामच्या अल सुफा संघटनेच्या संपर्कात आला. मॉब लिंचिंग आणि मुस्लिमांवरील अत्याचाराचे व्हिडिओ दाखवून तो प्रभावित झाला होता. तो ‘इसिस’ची जिहादी पुस्तके वाचत असे. तो ‘इसिस’च्या मॉड्यूलवरही काम करत होता. त्याला बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते

खाण अभियंता असल्याने तो आयईडी आणि इतर केमिकल बॉम्ब बनवण्यात निष्णात झाला. पुण्यात त्याने कोंढव्याच्या बोपतघाटात काही रासायनिक पदार्थही लपवून ठेवल्याचे सांगण्यात येते. ज्याद्वारे तो बॉम्ब बनवण्याचे काम करत होता. दरम्यान याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पुण्यातून पसार

शाहनवाज नागपुरात शिक्षणादरम्यान देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांमध्ये सामील झाला होता. शिक्षण पूर्ण करून तो पुण्याला गेला. यादरम्यान शाहनवाज जर्मन बेकरीप्रमाणेच त्याच्या साथीदारांसह वाहनात बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होता. त्याला पुणे पोलिसांनी वाहन चोरी करताना पकडण्यात आले होते.

यावेळी त्याचे साथीदार मोहम्मद इम्रान खान (वय २३) आणि मोहम्मद युनूस साकी (वय २४) हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. मात्र, शाहनवाज पोलिसांच्या वाहनातून उडी मारून पळून गेला. त्यानंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याच्यावर तीन लाखांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.

‘गझवा ए- हिंद’अभियान

देशात कट्टरवाद निर्माण करीत २०३४ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या माध्यमातून ‘गझवा ए- हिंद’ संकल्पनेद्वारे भारतातील युवकांना हेरून त्यांच्यामार्फत इंटरनेट आणि व्हॉट्स ॲपच्या ग्रुपच्या माध्यमातून अपप्रचार केला जातो. त्यातून देशातील मुस्लीम युवकांमध्ये कट्टरवाद निर्माण करीत त्यांच्या माध्यमातून देशविघातक कारवाया करीत असल्याचेही समोर आले आहे. त्याचा पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेशीही संबंध असल्याची माहिती आहे.

दहशतवादी अन् नागपूर

जून २००६ मध्ये पहाटे चार वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला.

मागील वर्षी जानेवारीत जैश-ए-मोहम्मदच्या रईस नावाच्या दहशतवाद्याला श्रीनगरमधून अटक. त्याने नागपुरात रेकी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT