nagpur sakal
नागपूर

Nagpur : ‘डीजे’ चा गोंगाट ; पोलिसांकडील उपकरणे ठरली शोभेची

विसर्जनावेळी वाजणाऱ्या डीजेचा आवाज हा ९० ते १०० डेसिबलपेक्षा जास्त असल्याची बाब नेहमीच समोर येते.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - गणेश विसर्जनाच्या निमित्ताने गेल्या तीन दिवसांपासून छोट्या-मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मंडळांकडून मिरवणुकी डीजे त्याचा तालावर तरुणाई थिरकताना दिसत आहे. मात्र, एकीकडे डीजेमुळे शहरात गोंगाट पसरला असून दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत मिरवणुकीत १०० डेसिबलपेक्षा जास्त प्रमाणात आवाज ऐकू आला. विशेष म्हणजे, या विरोधात पोलिसांकडून एकही कारवाई करण्यात आली नाही.

विसर्जनावेळी वाजणाऱ्या डीजेचा आवाज हा ९० ते १०० डेसिबलपेक्षा जास्त असल्याची बाब नेहमीच समोर येते. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास होतो. विशेष म्हणजे सायलेन्स झोनमध्येही त्याचा आवाज हा अधिक असल्याने नियमांची सर्रास पायमल्ली केल्याचे दिसते. ४५ डेसिबलच्यावर आवाज असल्यास त्यावर कारवाई करण्याचे याबाबत न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असूनही सर्रासपणे पोलिसांच्या समोर मोठ्याने आवाज करीत, डीजे वाजविण्यात आले. विशेष म्हणजे,

दोन दिवस सांयकाळी सहा वाजतापासून शहरातील विविध परिसरातून निघालेल्या मिरवणुकांमध्ये चौकात गर्दी जमल्याने लोकांना चालणेही अवघड झाल्याचे चित्र होते. त्यातच डीजे, ध्वनिवर्धक आणि ढोलताशांच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मध्यरात्री १२ वाजतानंतरही मिरवणुका सुरू असल्याने पोलिस प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले.

१०० पेक्षा अधिक डेसिबल नोंदीची शक्यता

गेल्या वर्षी विसर्जनाच्या मिरवणुकीत ९५.३ डेसिबल एवढी ध्वनीपातळी नोंदवली गेली होती. याआधी २०१८ साली ९२.५ डेसिबल ही ध्वनीपातळी नोंदवली गेली. कोरोना काळात विसर्जन मिरवणूक न झालेल्या २०२० आणि २०२१ मध्ये त्याची नोंद नव्हती. यंदा इतर वर्षीच्या तुलनेत १०० डेसिबलपेक्षा अधिकची नोंद होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आवाज कमी करण्यास सांगून विषय संपवला

मिरवणुकीदरम्यान वाजविण्यात येणाऱ्या डीजेचा आवाज दिलेल्या निर्देशांपेक्षा अधिक असतो. ते तपासण्यासाठी सर्वच पोलिस ठाण्यात डीजेचा आवाज मोजण्यासाठी उपकरण देण्यात आले आहेत. मात्र, त्या उपकरणाचा वापर झालाच नसल्याने त्या केवळ शोभेच्या वस्तू ठरल्या. विशेष म्हणजे, आवाज कमी करण्यास सांगून विषय संपविण्याचे धोरण पोलिसांनी स्वीकारले. हे विशेष म्हणजे.

४५ डेसिबलपेक्षा अधिक नको आवाज

कोणत्याही कार्यक्रमात वा मिरवणुकीत वाजविण्यात येणारे डीजे वा ढोलताशे यांचा आवाज हा निवासी भागात सकाळी ५५ डेसिबलपेक्षा कमी तर रात्री ४५ डेसिबलपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. औद्यागिक क्षेत्रात ७५ डेसिबल पेक्षा तर रात्रीच्या वेळी ६५ डेसिबलपेक्षा खाली असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Vote Counting: ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये तफावत का आढळली? मोठी अपडेट आली समोर

IPL Auction 2025: अमरावतीचं पोरगं आयपीएल खेळणार! 'या' संघात झाली निवड, ११ कोटी रुपयांमध्ये झाली खरेदी

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही पोहचले

World Chess Championship 2024: भारताच्या डी. गुकेशला सलामीलाच धक्का; गतविजेत्या डिंग लिरेनचा विजय

Rapper Badshah : रॅपर बादशहाच्या नाईट क्लबमध्ये स्फोट, हल्लेखोर मोटारसायकलवर आले अन्... पोलिसांकडून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT