नागपूर : निवडणुकांमध्ये ‘मुफ्त बिजली’ देण्याची घोषणा होते. ज्यातून मते मिळतील तेच ते करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून कधीच शंभर टक्के सोलर वीज देण्याबाबत काही होणार नसल्याने स्वयः प्रयत्नातून ‘एनर्जी स्वराज्य’ करता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन ‘सोलर गांधी’ म्हणून ओळख असलेले प्रो. चेतनसिंग सोलंकी यांनी केले. सौरऊर्जेबाबत देशभरात जनजागृती करण्याच्या उद्देशाने मध्यप्रदेशातून सुरू करण्यात आलेली ‘एनर्जी स्वराज यात्रा’ नागपुरात आली असताना ते ‘सकाळ’शी बोलत होते.
सोलंकी म्हणाले, महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात जनआंदोलनाला महत्त्व दिले. त्यातून एक चळवळ उभी राहिली. त्यामुळे प्रत्येकाच्या सहभागाने देशाने ती लढाई जिंकली. त्याचप्रमाणे जलवायू प्रदूषण कमी करण्यासाठी सोलर एनर्जी पर्याय असून, त्यासाठी चळवळीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या सहभाग घेतल्यास देशातच नव्हे तर जगात परिवर्तन होण्यास मदत होईल. त्यासाठी सरकारच्या अनुदानाची गरज नाही. केवळ देशातील नेते, अधिकाऱ्यांची मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. मात्र, ती मानसिकता नेत्यांमध्ये दिसत नाही. सोलर एनर्जीच्या नावावर प्लान्ट टाकणे सोपे आहे. मात्र, ती प्रत्येकाच्या घरात सुरू केल्यास त्याचा योग्य फायदा होईल. सामान्यांमध्येही ती मानसिकता अजून निर्माण व्हायची आहे. स्वतःला बदलण्यात त्यांनाही चाळीस वर्षे लागले. ते हळूहळू बदलतील. तेव्हाच मोठा बदल देशात घडून येईल.
या तीन गोष्टी करा
आपल्या गरजा मर्यादित ठेवणे, असलेल्या संसाधनाचा मर्यादित वापर करणे आणि केवळ सामान्य उत्पादनाचा वापर करणे या तीन गोष्टी करण्याचा सल्ला प्रो. सोळंकी यांनी दिला. त्यामुळे उर्जा बचत होण्यास मदतहोत असल्याचे ते म्हणाले.
समाजासाठी संशोधन करावे
मी आयआयटीमध्ये शिकलो. युरोपमध्ये संशोधन करीत, पीएच.डी मिळविली. ती समाजाच्या कोणत्या कामाची आहे हा प्रश्न मनात आला. त्यातून या अभियांनाकडे वळलो. याप्रमाणेच देशातील अनेक आयआयटीमध्ये शिकणाऱ्या आणि शिकविणाऱ्यांनी त्यांनी केलेले विज्ञानाचे संशोधन समाजाच्या हितासाठी करावे असे आवाहन चेतन सिंग सोलंकी यांनी केले.
अशी मिळाली प्रेरणा
यात्रेला एनर्जी स्वराज्य नाव देण्यामागे मोठी प्रेरणा आहे. २०१८-१९ मध्ये जगाचे भ्रमण करीत असताना, वातावरणाशी निगडित अनेक समस्या बघितल्या. त्यामुळे संपूर्ण जगात ‘फील गुड’ असे काही दिसत नसल्याचे जाणवले. त्याच्या खोलात गेल्यावर ही परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी करावे लागणार आणि त्याची सुरुवात आपल्यापासूनच करावी लागणार असल्याने ‘एनर्जी स्वराज फाऊंडेशन’ची सुरुवात केल्याचे चेतन सिंग सोलंकी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.