Nagpur High Court Bench  Esakal
नागपूर

Petition against EVM: ईव्हीएमविरुद्ध याचिकेवरून उच्च न्यायालयाने फटकारले, याचिकाकर्त्याने घेतली माघार, जाणून घ्या प्रकरण

देशातील यंदाच्या लोकसभा निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

Supreme Court on Petition Against EVM: देशातील यंदाच्या लोकसभा निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने याचिकेत दावा केलेल्या मुद्यांबाबत ठोस माहिती नसल्याबद्दल न्यायालयाने फटकारले. त्यामुळे याचिकाकर्ते ॲड. संतोष चव्हाण यांनी याचिका मागे घेतली.

या प्रकरणावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. नागपूर मतदारसंघाचे उमेदवार संतोष चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, देशातील जनतेची इच्छा आहे की २०२४ च्या लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात.

ईव्हीएमपेक्षा मतपत्रिका अधिक पारदर्शक असून, नागरिकांना त्यांची मौल्यवान मते देताना अधिक आत्मविश्वास मिळतो. देशभरातील सजग नागरिक आणि वकिलांनी ईव्हीएमचा विरोध केला असून ईव्हीएमवर बंदी घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे, पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी लोकसभेच्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. हे शक्य नसल्यास १०० टक्के व्हीव्हीपीएट स्लिप मोजण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती.

केवळ विधाने, गृहपाठाचा अभाव

न्यायालयाने आपल्या तोंडी निरीक्षणात म्हटले आहे की केवळ ईव्हीएमवर निवडणुका होऊ नयेत. या संदर्भात सामान्य विधाने करण्यात आली आहेत. याचिकाकर्त्याने ईव्हीएम सदोष असल्याचा दावा केला आहे. परंतु, ईव्हीएममध्ये दोष का आहे, याबद्दल कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. तसेच, याचिकाकर्त्याने ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन्सबाबत गृहपाठ न केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT