नागपूर

Nagpur Hawkers Zone: पोलिसांची उच्च न्यायालयाला विनंती, 'या' भागातील मुख्य बाजारपेठेत हॉकर्स झोन नको

टाऊन व्हेंडिन समितीतर्फे शहरातील फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हॉकर्स झोन निश्चित केले जात आहेत. यासाठी काही ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Sitabardi Hawkers Zone: टाऊन व्हेंडिन समितीतर्फे शहरातील फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हॉकर्स झोन निश्चित केले जात आहेत. यासाठी काही ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. यावर एकूण सहा आक्षेप घेण्यात आलेत. यात सीताबर्डी बाजारातील मुख्य रस्त्यावर हॉकर झोन नकोच, अशी भूमिका पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात घेतली आहे. शहरातील विविध संघटनांनी ही याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि मुकुलिका जवळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शहरातील फेरीवाल्यांच्या समस्या, त्यांच्यासाठी विकसित करण्यात येत असलेले हॉकर झोन, त्यासाठीचे सर्वेक्षण याबाबत न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. फेरीवाल्याचे प्रश्‍न मार्गी लागावे म्हणून टाऊन व्हेडिंन समिती तयार करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

या समितीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत हॉकर झोनचा मुद्दा चर्चेला आला होता. यात जुन्या ५३ पैकी ४७ ठिकाणी हॉकर झोन तयार करण्याचे निश्चित केले जाणार आहे. गेल्या सुनावणीत या जागांची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यावेळी पोलिस प्रशासनाने सीताबर्डी परिसरातील मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांना हॉकर झोन देण्यास आक्षेप घेतला आहे.

हा रहदारीचा रस्ता असून येथे हॉकर देण्यात येऊ नये, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. याखेरीज अन्य पाच आक्षेप व हरकती नोंदविण्यात आल्यात. या हरकतींवर समितीने पुढील तीन आठवड्यांत निर्णय घ्यावा व जागा निश्चित कराव्यात, असे आदेश यावेळी न्यायालयाने दिले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. राहुल भांगडे यांनी, तर महापालिकेतर्फे ॲड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT