नागपूर

Nagpur Crime: चौघांवर संशय आला म्हणून पोलिसांनी घेतली झडती अन्...टळला मोठा अनर्थ

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime: पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत लष्करीबाग परिसरात पेट्रोलिंगदरम्यान दरोड्याच्या तयारीस असलेल्या चौघांना पोलिसांनी पिस्तूल आणि घातक शस्त्रासह ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

सूरज उर्फ सनी सुनील कोचे (वय ३६, रा. धार्मिक राशन दुकानाजवळ, लष्करीबाग), लकी लक्ष्मण मलिक (वय २२, रा. ठक्करग्राम पाचपावली), मोहम्मद तौसिफ उर्फ गोलू अब्दुल सत्तार (वय १९, रा. टेका नई बस्ती,पाचपावली), राकेश नरेश झोडापे (वय २३, रा. बारसे नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कुणाल समुद्रे (रा.काशीबाई देऊळजवळ, कोतवाली) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मंगळवारी (ता.६)मध्यरात्रीच्या सुमारास पाचही जण हे लष्करीबागातील समता मैदान, कलकत्ता रेल्वे लाईनजवळ दरोड्याच्या तयारीत बसले असताना, त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल, एक तलवार, एक भाल्याचा पाता, तिखट, दोरी असा मुद्दमाल जप्त केला. marathi-news (esakal.com)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : आमदार राजेद्र शिंगणे यांची अजित पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

बिग बॉस फेम अरमान मलिकचा मोठा अपघात; थोडक्यात बचावला जीव, व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT