Nagpur  Esakal
नागपूर

Indian Railway: रेल्वेचा स्लीपर डबा की प्रवाशांचा कोंडवाडा? उकाड्यासह गर्दीमुळे वाढला त्रास, महिलांसह मुलांची गैरसोय

क्षमता नसतानाही जनरल आणि स्लीपर डब्यांच्या अमाप तिकीट वाटल्या जात असल्याने रेल्वेच्या दोन्ही कोचमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Railway Coach Inconvenience due to Overcrowding: क्षमता नसतानाही जनरल आणि स्लीपर डब्यांच्या अमाप तिकीट वाटल्या जात असल्याने रेल्वेच्या दोन्ही कोचमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. शौचालयाजवळ लोकं झोपून प्रवास करीत असल्याने शौचालयाला जाणाऱ्या महिला, लहान मुले व वृद्धांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेमुळे प्रवाशांचे उन्हाळ्यात हाल होत आहेत.

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नियोजना अभावी नागपूरमार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासामुळे प्रवाशांना हा प्रवास आता जीवघेणा ठरू लागला आहे. याचा अनुभव गुरुवारी पुन्हा प्रवाशांना आला. गाडी क्रमांक १२८४९ बिलासपूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये जनरल डबा सोडा स्लीपर डब्यात पाय ठेवायला जागा नव्हती. शेकडो प्रवाशांनी उभे राहून प्रवास केला.

स्लीपर डब्यात तिकीट आरक्षण करून प्रवास करणाऱ्यांना चक्क जनरल डब्याचा अनुभव येत होता. तेथे शौचालयाजवळ प्रवासी झोपून होते. शौचालयाला जाणाऱ्यांना तिथे पोहोचणे अवघड झाले होते. त्यामुळे महिला आणि लहान मुलांची कुचंबणा झाली. उन्हाचे चटके आणि गर्दी अशी दुहेरी कोंडी प्रवाशांची झाली. नागपूर स्थानकावर गुरुवारी आलेली गाडी क्रमांक १२७९२ दानापूर-सिकंदराबाद या गाडीमध्ये गर्दीमुळे प्रवासी जीव धोक्यात घालून चढण्याचा प्रयत्न करीत होते. (Latest Marathi News)

डब्यांची संख्या घटवली, फटका प्रवाशांना

बहुतांश रेल्वेगाड्यांचे वातानुकूलित डबे वाढवून स्लीपरचे डबे रेल्वे प्रशासनाने कमी केले. त्यामुळे स्लीपरमध्ये आणखी गर्दी वाढत आहे. बिलासपूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये केवळ ५ स्लीपरचे डबे होते. प्रवाशांची संख्या शेकडो होती. अशा गाड्यांमध्ये जनावरांसारखे प्रवासी कोंबले जात आहेत. जनरल डब्याचा तर विचार न केलेलाच बरा. गर्दीच्या डब्यात टीटीई आणि आरपीएफ फिरकत नाही. नागपूर-गोंदिया मार्गावरील बहुतांश गाड्यांमध्ये टीटीईंची मुजोरी वाढली असून असभ्य वागणूक मिळत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

जनरल आणि स्लीपर कोचची संख्या वाढवायला हवी. अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्यांना परवानगी देऊ नये. आरपीएफ आणि टीटीईंनी गाड्यांची तपासणी करायला हवी. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका प्रवाशांना बसत आहे. (Latest Marathi News)

- बसंतकुमार शुक्ला, सचिव-भारतीय यात्री केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Vikhe Patil Won Shirdi Assembly Election 2024 final result live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT