नागपूर

Nagpur Railway Station: नागपूर रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार, वारसा व आधुनिकतेचे असणार मिश्रण

मुख्य रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येत असून वारसा आणि आधुनिकतेच्या मिश्रणाचा हा उत्तम नमुना राहणार आहे. सध्या स्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Railway Station Reconstruction: मुख्य रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येत असून वारसा आणि आधुनिकतेच्या मिश्रणाचा हा उत्तम नमुना राहणार आहे. सध्या स्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे.

मध्य रेल्वेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे बघितले जात आहे. पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागातील काम जोमाने सुरू आहे. प्रवाशांचे स्वागत पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूंना नवीन आगमन आणि निर्गमन इमारतींद्वारे केले जाईल.

पूर्वेकडे ग्राउंड फ्लोअरसह पाच मजली आगमनाची इमारत आणि निर्गमन इमारत असेल. तर पश्चिमेकडे दर्शनी भागासह स्थानकाचे हेरिटेज आकर्षण कायम राहणार आहे. प्रवाशांच्या गर्दीवर उपाय म्हणून एक प्रशस्त रूफ प्लाझा राहणार असून स्थानक पूर्णपणे दिव्यांगांसाठी अनुकूल असेल. (Latest Marathi News)

यात २८ लिफ्ट आणि २८ एस्केलेटर असतील. आकर्षक रोषणाई, स्पष्ट चिन्ह, पुरेसे प्रतीक्षा क्षेत्र आणि आधुनिक सुविधा मिळतील. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतील. स्थानकात एक हरित इमारत राहणार असून त्यात सौरऊर्जेचा वापर करण्यात येईल. कॅफे आणि इतर सुविधा असतील. सध्या स्थानकाच्या कामाला गती मिळाली असून हा प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT