nagpur rain forecast weather update orange and red alert issue imd sAKAL
नागपूर

Nagpur Rain Forecast : नागपूर शहरात आज मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भात ऑरेंज व रेड अलर्ट

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बुधवारी संततधार पावसाने दाणादाण उडविल्यानंतर गुरुवारीही वरुणराजाने सायंकाळी शहरात हजेरी लावली. मात्र काही वेळा पुरत्याच हलक्या सरी बरसल्याने नागपूरकरांची निराशा झाली. मात्र शुक्रवारी विदर्भात ऑरेंज व रेड अलर्ट असल्यामुळे मुसळधार किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही सावध राहावे लागणार आहे.

गरुवारी दिवसभर ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ चालला. मात्र सायंकाळी पाचनंतर आभाळ भरून आले. रामदासपेठ, धंतोलीसह मोजक्याच भागांत मेघगर्जनेसह दहा ते पंधरा मिनिटे हलका पाऊस बरसला. त्यामुळे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचा पुन्हा हिरमोड झाला.

तथापि शुक्रवारी व शनिवारी नागपुरात ऑरेंज अलर्ट असल्यामुळे धुवॉधार पावसाची दाट शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. दुहेरी अलर्टच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सावध राहण्याची गरज आहे.

प्रशासनही ‘अलर्ट मोड’वर

जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही ‘अलर्ट मोड’वर आहे. १८ ते २१ जुलैदरम्यान शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

तापमानात तीन अंशांची वाढ

दुपारी काही काळ ऊन तापल्याने कमाल तापमानातही लक्षणीय वाढ झाली. चोवीस तासांत नागपूरचा पारा तीन अंशांनी चढून ३३.४ अंशांवर गेला. पावसाळी वातावरण असूनही यवतमाळ वगळता सर्वच जिल्ह्यांतील तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तापमानवाढीमुळे दुपारच्या सुमारास थोडा उकाडाही जाणवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT