nagpur sakal
नागपूर

Nagpur Rain News : पावसाचा तडाखा, राजेंद्रनगर झोपडपट्टी पाण्यात नंदनवनमध्येही रस्ते बुडाले

झोपेत असलेल्या नागरिकांना त्याची झळ पोहचू लागली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - नागपुरात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय झाले. याचा सर्वाधिक तडाखा नागनदी लगत असलेल्या राजेंद्रनगर झोपडपट्टी ला बसला. भीतीलगत असलेल्या घरासह जवळपास सिमेंट रस्त्याजवळच्या घरात तीन ते चार फूट पाणी शिरले.

मध्यरात्री पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे नागनदीचा जलस्तर वाढू लागला. झोपेत असलेल्या नागरिकांना त्याची झळ पोहचू लागली. यादरम्यान राजेंद्रनगर परिसरातील झोपडपट्टी मधे पाणी शिरू लागले. रात्री बरसणारा पाऊस आणि घरात पाणी यामुळे नागरिकांची अवस्था बिकट झाली होती.

भिंतीलगत असलेल्या घरांना याचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे त्यांना घरे सोडावी लागली. विशेष म्हणजे सिमेंट रस्तेही पाण्याने तुडुंब भरले असल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळी पाऊस कमी झाला. मात्र, अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. या प्रकाराने नागरिक प्रशासनावर आगपाखड करताना दिसून येत होते. दरम्यान एनडीआर एफ आणि आपात्कालीन पथक या परिसरात नागरिकांना काढण्याचे काम करताना दिसून आले.

नंदनवन झाले तलाव

एकीकडे झोपडपट्टी भागात पाणी तुंबले असताना दुसरीकडे परिसरातील पॉश वस्ती असलेल्या नंदनवन भागातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिक हैराण झाले होते. हसनबाग चौक ते नंदनवन मुख्य रस्ता पाण्यात होता. नुकत्याच तयार करण्यात आलेला सिमेंट रस्ताही नाल्या बुजविल्याने पाण्यात होता.

वाठोडा जलमय

वाठोडा परीसरात असलेल्या शक्तीमातानगर, विद्यासागर, पवनशक्तीनगर ते कुकरेजा हाईट्स ते जुना वाठोडा आणि भांडेप्लॉट पासून नजीक असलेल्या सर्व वस्त्या पाण्यात गेल्यात. विशेष म्हणजे श्रीकृष्णनगर परिसरात असलेली भवन्स शाळेतच्या परिसरात असलेल्या सर्व रस्त्यावर पाणी साचले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT