Nagpur Lok Sabha Election: नितीन गडकरी यांच्या प्रभावामुळे काँग्रेसकडून एकही बडा नेता लढण्यास तयार नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत येथे होत असते. दलित व मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ‘आरपीआय’ला अस्तित्त्व निर्माण करता आले नाही. दहा वर्षांत गडकरींनी विकासामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला, कार्यकर्त्यांची फळी आणि गडकरींचे वलय यामुळे भाजपचे पारडे जड आहे.
नितीन गडकरी (भाजप) विजयी मते : ६५७६२४
नाना पटोले (काँग्रेस) मते : ४४२७६५
महम्मद जमाल (बसप) मते : ३१६५४
सागर डबरासे (वंचित आघाडी) मते : २५९९३
विजयी उमेदवाराचे मताधिक्य : २१४८५९
२००४ : काँग्रेस
२००९ : काँग्रेस
२०१४ : भाजप
२०१९ : भाजप
काँग्रेसमध्ये गटबाजी. परस्परांत मतभेद
प्रदेशाध्यक्ष पटोले एकाच गटाला महत्त्व देत असल्याने काँग्रेसमध्ये दुफळी
पंधरा वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने आपापसांतील सुप्त संघर्षात वाढ
नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस अशा दोन गटात भाजपची विभागणी
रस्त्यांचे डांबरीकरण आणि उड्डाणपुलांचा अतिडोस
अतिवृष्टीने घराघरांत पाणी शिरल्याने भाजप नेत्यांवर मतदारांचा रोष
आरक्षणावरून अडीच लाखांच्या घरात असलेल्या हलबा मतदारांचा भाजपवर रोष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.