Nagpur SC Vasti Yojana: जनसुविधा, नागरी सुविधासोबत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेच्या निधीवरून जिल्हा परिषदेतील राजकारण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषदेला अद्याप निधी आला नसून मंजूर कामांची यादी आली. या मंजूर यादीत १५० कामे दुबार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच प्रमाणे नगर पंचायतींमधील कामे मंजूर यादीतून वगळून नवीन गावांतील कामे घ्यावी लागतील. यात बराच वेळ जाणार आहे. येत्या काही दिवसात आचारसंहिता लागणार असल्याने ही योजना यंदाच्या वर्षात अडचणीत सापडणार असल्याचे चित्र आहे.
या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेला वर्ष २०२३-२४ साठी २५ कोटींचा निधी मंजूर आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध नागरिक बहुल असलेल्या वस्तींमध्ये यातून कामे घेण्यात येते. योजनेतील ४९० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ती मागील सात-आठ महिन्यांपूर्वी दिली होती. त्यात आतापर्यंत काही वस्त्यांमध्ये इतर योजनेंतर्गत कामे पूर्ण झाली आहे.
तर काही कामे मंजूर आहेत. तसेच काही ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषद,नगरपंचायतीमध्ये झाले आहे. त्यामुळे काही कामे येथील आहे. नियमानुसार नगर परिषद, नगर पंचायतीमध्ये कामे करता येत नाही. त्यामुळे यादीतून येथील कामे वगळावी लागणार असून दुसऱ्या गावातील कामे घ्यावी लागतील. (Latest Marathi News )
ज्या गावांची लोकसंख्या कमी आहे, अशा गावांना अधिकचा निधी देण्यात आला. तर ज्या गावांमध्ये या घटकाची जास्त लोकवस्ती आहे, अशा गावांना कमी निधी देण्यात आल्याचे सांगण्यात येत. काही गावांना निधीच देण्यात आला नाही.
नुकत्याच प्राप्त झालेल्या यादीत मोठा घोळ असल्याने जिल्हा परिषदेने या सर्व बाबींचा अचूक तपशील खंडविकास अधिकाऱ्यांना तत्काळ मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे एका आमदाराच्या लेटरहेडवर आधीच ग्रामपंचायतींना कामे मंजूर झाल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. (Latest Marathi News )
विभागाला मंजूर कामांची यादी प्राप्त झाली आहे. परंतु यावर्षी व त्यापूर्वीच्या वर्षातील आदेशात तफावत दिसून येते. यादीतील काही दुबार असून काही कामे नगर पंचायत क्षेत्रतील आहे. ती वगळावी लागेल. शिवाय तांत्रिक मान्यता अस्पष्ट आहेत. त्यामुळे नव्याने यादी तयार करावी लागेल, असे दिसते. सर्व नियम तपासून कार्यवाही करण्यात येईल.- मिलिंद सुटे, सभापती, समाज कल्याण, जि.प.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.