Nagpur car aciident esakal
नागपूर

Nagpur : वैनगंगा नदीत स्कार्पिओ वाहन कोसळले

वाहनात सात प्रवाशी असल्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

गोंडपिपरी : गोंडपिपरीकडून आष्टीकडे जात असलेले स्कार्पिओ वाहन वैनगंगा नदीत कोसळले.सायंकाळी सहा वाजताच्या सूमारास हि घटना घडली.वाहनात सात प्रवाशी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.घटनेची माहिती कळताच तहसिलदार के.डी मेश्राम,ठाणेदार जिवन राजगुरू घटनास्थळी पोहचले.हे वाहन कुणाचे होते,वाहनात बसलेले प्रवासी कोण यासंदर्भात अद्यापही माहिती मिळू शकली नाही.यासंदर्भात प्रशासन कामाला लागले आहे.

गोंडपिपरी तालुक्यासाठी आज घातवार ठरला.सकाळी धानापूर गावात बैलबःडी घेऊन शेततळ्यात बैलांना पाणी पाजण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याचा व बैल.गायीचा मृत्यू झाला.दुपारी झरण गावाजवळ झालेल्या अपघातात दिलीप टेकाम या बाईकचालकाचा जागीच मृत्यू झाला.तर सायःकाळी विठ्ठलवाडा भंगाराम तळोधी मार्गावर दुचाकीच्या आमनेसामने धडकीन चीमुर तालुक्यातील हिवरा येथील सुनील कोडामलवार यांचा मृत्यू तर त्यांची पत्नी यासह फरकडे व गौरकार हे तिघे गंभीर जखमी त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सूरू आहे.

अशातच सायंकाळी गोंडपिपरी वरून आष्टीकडे जाणारी स्कार्पिओ वाहन वैनगंगा नदीत कोसळले.सध्या वैनगंगा नदी तुडूंब वाहत आहे.अशावेळी स्कार्पिओ संदर्भात माहिती मिळविण्यासाठी प्रशासनाची चमू कामाला लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: बाळासाहेबांची 'ती' इच्छा, पूर्ण कशी झाली सांगताना नरेंद्र मोदींचं 'मविआ'वर टीकास्त्र

Arjun Tendulkar च्या संघाचा विक्रम! Ranji Trophy च्या ९० वर्षांच्या इतिहासात कुणीच केला नव्हता असा पराक्रम

आर. के. नारायण यांच्या अजरामर कथांना उजाळा; ओटीटीवर बालदिनानिमित्त 'मालगुडी डेज'चा नजराणा

Share Market Closing: प्रचंड चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद; निफ्टी 23,532 अंकांवर, कोणते 10 शेअर्स वाढले?

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT