Stamp paper 
नागपूर

नागपूर : स्टॅम्प पेपरचा काळाबाजार

१०० रुपयाच्या स्टॅम्पसाठी मोजावे लागते १२० रुपये

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्पॅम्प पेपरचा काळाबाजार सुरू आहे. व्हेंडर्सकडून स्टॅम्पपेपरची कृत्रिम टंचाई अधिक दराने विक्री करण्यात येत आहे. १०० रुपयांचे स्टॅम्प पेपरसाठी १२० ते १३० रुपये मोजावे लागत आहे. जादा किंमत आकारून त्यांच्याकडून नागरिकांची लूट होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, रघुजीनगर, रेशीमबाग आणि महाल येथील रजिस्ट्री कार्यालयात हा धंदा खुलेआम सुरू आहे. स्टॅम्प व्हेंडर्सवर होणारी कारवाई थातूरमातूर असल्यामुळे त्यांचीही हिंमत वाढली आहे. तातडीचे काम आणि झंझट नको म्हणून नागरिकही जास्त किमतीत स्टॅम्प खरेदी करताना दिसत आहेत.

स्टॅम्प व्हेंडर्सवर कारवाईचे अधिकार आहेत. पण या विभागाचे अधिकारी तक्रारींची क्वचितच दखल घेतात. दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आणि अन्य विविध कामांसाठी स्टॅम्पपेपरची गरज भासते. विद्यार्थ्यांच्या निकालानंतर स्टॅम्पपेपरचा काळाबाजार का होतो, हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय अनधिकृत व्हेंडर्सनेही स्टॅम्पविक्रीचा धंदा सुरू असल्याचे सांगण्यात येते.

शपथपत्र, भाडेपत्र, जमीन खरेदी- विक्री, जातीचे प्रमाणपत्र, जन्माचे प्रमाणपत्र, नळ व विजेच्या कनेक्शनसह बहुतांश कामांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता असते. नागपूर शहरात अधिकृत ५५ स्टॅम्प व्हेंडर्स आहेत. दररोज ३ हजारांपेक्षा जास्त स्टॅम्पची विक्री होते. व्हेंडरने चालान भरल्यानंतर त्यांना हवे तेवढे स्टॅम्प कोषागार कार्यालयातून देण्यात येतात. कोरोना

काळाप्रमाणे सध्या स्टॅम्पचा तुटवडा नाहीच. स्टॅम्प व्हेंडर्सला सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. त्यानंतरही होणारा काळाबाजार होत आहेत. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली होती. अधिकच्या दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. परंतु अद्याप कुणावरही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील व्हा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT