nagpur  sakal
नागपूर

Nagpur : चार महिन्यांत ५० हजार श्‍वानांची नसबंदी

महापालिकेचे उच्च न्यायालयात शपथपत्र; जनहित याचिका प्रलंबित

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - गेल्या चार महिन्यांत शहरातील चार हजारांहून अधिक मोकाट श्‍वानांची नसबंदी करण्यात आली. २४ मे ते १३ सप्टेंबर २०२३ दरम्यान भांडेवाडी केंद्रात ३ हजार ४८१ आणि गोरेवाडा केंद्रात ६४१ अशा ४ हजार १२२ श्‍वानांची नसबंदी केल्याची माहिती नागपूर महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल करीत दिली. शहरातील मोकाट श्‍वानांच्या वाढता हैदोस लक्षात घेत विजय तालेवार आणि मनोज शाक्य यांनी दाखल केलेली जनहित याचिका प्रलंबित आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

काही महिन्यांपूर्वी काटोल येथील एका पाच वर्षाच्या मुलाला मोकाट श्‍वानांनी चावा घेतला होता. शहरात मोकाट श्‍वानांची उपद्रव सुरूच असून, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज शहरात एक लाखाहून अधिक मोकाट श्‍वान आहेत.

श्‍वान पकडल्यानंतर महापालिकेने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. गेल्या सुनावणीत न्यायालयाने आतापर्यंत काय कारवाई केली? किती भटके श्‍वान पकडले? ते पकडले गेल्यावर त्यांचे काय झाले? किती श्‍वानांची नसबंदी करण्यात आली? आदी प्रश्न महापालिकेला विचारले. तसेच, ही सर्व माहिती आठवडाभरात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, महापालिकेतर्फे आज नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखलकरीत माहिती देण्यात आली. महापालिकेतर्फे ॲड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.

नसबंदी केंद्रात वाढ महापालिकने २४ जुलै २०२३ रोजी हैद्राबाद येथील स्वातंत्र ॲनिमल वेल्फेअर सोसायटीसोबत करार केला आहे. महाराजबाग रोडवरील शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ही सोसायटी शेड तयार करणार असून महाविद्यालयात सुरु असलेल्या दुरुस्ती कामांमुळे ते अद्याप शक्य झाले नसल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. या महाविद्यालयातील केंद्रावर देखील श्‍वानांच्या नसबंदीचे काम सुरू केले जाणार आहे.

एका श्‍वानासाठी १ हजार ६०० रुपये शहरातील मोकाट श्‍वानांची नसबंदी करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला. यासाठी में. व्हेट्स फॉर ॲनिमल, सातारा आणि मे. क्रिष्णा सोसायटी फॉर ॲनिमल, उस्मानाबाद या दोन संस्थांसोबत करार केला आहे. भांडेवाडी आणि गोरेवाडा या दोन केंद्रांवर हे नसबंदीचे काम सुरू आहे. एका श्‍वानाच्या नसबंदीसाठी महापालिका या संस्थांना १ हजार ६०० रुपये देते. त्यानुसार, आतापर्यंत ४ हजार १२२ कुत्र्यांच्या नसबंदीवर महापालिकेने ६५ लाख रुपये खर्च केले आहेत.

दहा व्हॅनची खरेदीमोकाट श्‍वानाने कुणाला चावा घेतला किंवा कुत्र्यांमुळे काही दुर्घटना घडल्यास नागरिक तक्रारी करतात. अशा वेळी घटनास्थळी जाऊन तातडीने कारवाई करण्यासाठी महापालिकेने दहा व्हॅन खरेदी केल्या आहेत. महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये एक व्हॅन असणार आहे, अशी माहितीही महापालिकेने शपथपत्रात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT