Nagpur Swine flu disease crisis 
नागपूर

नागपूरवर संकट स्वाइन फ्लूचे!

जिल्ह्यात १२ रुग्ण, आठ जण रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - कोरोना डोक्यावर नाचत असतानाच उपराजधानीवर आता स्वाइन फ्लूचे संकट घोंघावत आहे. विभागात स्वाइन फ्लूचे १४ रुग्ण आढळले असून त्यापैकी १२ नागपूर जिल्ह्यातील आहेत. शहराला बिमारीचे हे संकट नवीन नाही. १३ वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूची दहशत पहिल्यांदा पसरली होती. त्यात ४५ जणांचा जीव स्वाइन फ्लूने घेतला होता. जिल्‍ह्यात आढळलेल्या रुग्णांपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असून एक जण व्हेंटिलेटरवर आहे.

राज्यात स्वाइन फ्लूचे संकट पहिल्यांदा २००९ मध्ये आले. विभागात त्यावेळी ४५ मृत्यू झाल्याने स्वाइन फ्लूच्या प्रतिबंधासाठी तत्काळ उपचाराची ब्लू प्रिंट तयार झाली होती. राज्यभर संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा तत्काळ लागू केला गेला. वर्षभरातच २०१० मध्ये पॅनेन्झा लस उपलब्ध झाली होती. २०११ मध्ये स्वाइन फ्लूचे केवळ २ रुग्ण आढळले होते. मात्र २०१५ मध्ये नागपूर विभागात स्वाइन फ्लूचा उद्रेक झाला असून ७९० रुग्ण आढळले होते, यात १७९ जण दगावले होते. यानंतर २०१६ मध्येदेखील स्वाइन फ्लूचा हैदोस थांबला होता. मात्र, पुन्हा नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये २०१७ मध्ये १२३ जण दगावले होते. २०२० मध्ये सहा तर २१ मध्ये १० रुग्ण आढळले होते. पण एकही मृत्यू झाला नव्हता.

जानेवारी ते २१ जुलै २०२२ या काळात आढळलेल्या एकूण १४ रुग्णांमध्ये नागपूर जिल्ह्यातील १२, चंद्रपूर जिल्ह्यातील १ तर एक जण मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील आहे. आढळलेल्या एकूण स्वाइन बाधितांमध्ये १० पुरूष आणि ४ महिला आहेत. सध्या नागपुरातील विविध रुग्णालयांत ८ गंभीर संवर्गातील स्वाइन फ्लूबाधितांवर उपचार सुरू आहेत. ६ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

लक्षणे

  • घशात खवखव

  • ताप येणे

  • डोके दुखणे

  • खोकला

  • नाकातून पाणी गळणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT