नागपूर : सक्करदरा परिसरात वास्तव्यास असलेले संत ताजुद्दीन बाबा यांचे वंशज सय्यद तालिब ताजी वोल्ड सय्यद युसूफ इक्बाल ताजी (वय ३२ रा. मोठा ताजबाग) यांना शनिवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास दोन दहशतवादी संघटनेकडून धमकीचा मेल आला. यामध्ये मुसलमान असून हिंदू संघटनांना मदत करीत असल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान याबाबत त्यांनी सक्करदरा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद तालिब ताजी वोल्ड सय्यद युसूफ इक्बाल ताजी हे ‘सज्जाद नशीन’ या पदावर आहेत. शनिवारी रमजानची नमाज अदा केल्यावर ८.१५ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अलर्ट आला. रमजान असल्याने इफ्तार केल्यावर ८.५० वाजता त्यांनी मेल तपासला. त्यात झकाखान ‘zaka zakatraders1990gmail.com’ या नावाने आलेले ताजुद्दीन बाबांच्या वंशजाला जीवे मारण्याची धमकी
दोन ई-मेल तपासले असता, त्यात जमात उल दावा हाफीज सईद, तहरिके तालिबान संघटनेने तुम्ही मुसलमान असून हिंदू संघटनांना मदत करीत असल्याने आम्ही तुमच्यावर नजर ठेऊन आहोत, तुम्हाला केव्हाही इजा पोहचवू शकतो असे नमूद करण्यात आले. दरम्यान मेल मिळताच, त्यांनी सक्करदरा पोलिस ठाणे गाठले. त्यातून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान ई-मेल सुरतवरून आल्याने पोलिसांनी याबाबत गांभिर्य दाखवित तपास सुरू केला आहे.
यापूर्वीही पाच ते सहा वेळा धमकी
सय्यद तालिब ताजी वोल्ड सय्यद युसूफ इक्बाल ताजी यांना यापूर्वीही चार ते पाच वेळा जीवे मारण्याच्या धमकी मिळाली आहे. त्यातून त्यांना पोलिसांकडून सुरक्षा प्रदान करण्यात आलली आहे. आता पुन्हा एकदा धमकी मिळाल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
शहरात धमक्यांचे सत्र
गेल्या दोन महिन्यात सातत्याने शहरातील मोठ्या व्यक्तींना फोनद्वारे धमकी देण्यात येत आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दोनदा बेळगावच्या कारागृहातून धमकी आणि खंडणीचे फोन आले. मंगळवारी (ता.२८) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्बने उडविण्याची धमकी फोनवरून देण्यात आली होती. आता ताजुद्दीन बाबांच्या वंशजाला धमकीचा ई-मेल आल्याने शहरात असे धमक्यांते सत्र सुरू असल्याची चर्चा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.