Nagpur esakal
नागपूर

Nagpur : रामजन्मभूमी आंदोलनाशी बर्डीतील मंदिराचा संबंध

मध्य वस्तीतील मंदिराला १८९ वर्षांचा इतिहास

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : पातुरकर राममंदिर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सीताबर्डी येथील १८९ वर्षे जुन्या राममंदिराची माहिती अनेकांना नसेल. कारण, पातुरकर कुटुंबातर्फे त्याचा प्रचार करण्यात आला नाही. या पुरातम राम मंदिरात दर्शनार्थींची संख्या कमी असल्याने मंदिरात प्रवेश करताना एक वेगळ्या प्रकारचे कंपन अनुभवायला मिळते. सर्वत्र वातावरण श्रीराममय झाले असताना या पातुरकर राम मंदिराचा रामजन्मभूमी आंदोलनाशी असलेला संबंध पुढे येत आहे.

या मंदिरामध्ये १९९२ मध्ये अयोध्या कारसेवेदरम्यान विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनीच्या पदाधिकारी, सदस्यांनी मंदिरात सभा घेतल्या होत्या. त्याचवेळी, लोकांना मंदिरासाठी योगदानाचा एक भाग म्हणून प्रत्येकाला अयोध्येला पाठवण्यासाठी विटा गोळा करण्यास सांगितले गेले. लोकांनी विटा गोळा करून या राममंदिराकडे जमा केल्या आणि नंतर त्या विटा अयोध्येला पाठवण्यात आल्या. इतर क्षेत्रातील अनेक नेते किंवा दिग्गजांनी या मंदिराला कधीही भेट दिली नाही आणि हे मंदिर चालवणाऱ्यांना त्याबद्दल कोणतीही खंत नाही.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे किर्तनकार चारुदत्तबुवा आफळे किंवा रोहिणी माने परांजपे यांच्यासारखे ‘कीर्तनकार’ जेव्हा जेव्हा नागपुरात असतात तेव्हा ते मंदिराला भेट देतात. या मंदिराची स्थापना १८३५ मध्ये करण्यात आली. म्हणजे त्याला १८९ वर्षे पूर्ण होत आहेत. दिगंबरबुवा पातुरकर आणि समकालीन लोकांनी मंदिराची स्थापना केली होती. श्रीरामाची पूजा करणाऱ्या पंकज पातुरकर यांची ही सहावी पिढी आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील ‘प्राण प्रतिष्ठा’च्या दिवशी, नागपूर येथील हे मंदिरही या उत्सवात सहभागी होणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण दिवस विविध आध्यात्मिक कार्यक्रम होतील. मंदिर कुठल्याही ट्रस्ट किंवा संस्थेशी जोडले गेलेला नाही. पातुरकर कुटुंबीय परंपरेनुसार मंदिराचे पावित्र्य, निर्मळता आणि शांती राखण्याचा प्रयत्न करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT