नागपूर - गेल्या दोन वर्षांपासून केळीबाग रोड रुंदीकरणाचे काम पुन्हा रखडले आहे. नगर भूमापन व नगररचना विभागाच्या दिरंगाईमुळे अऩेक प्रकल्प रखडल्याची तक्रार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे आमदारांनी केली. रस्त्याच्या संथगतीने कामामुळे गडकरी यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले.
महाल येथील केळीबाग रोड, रामजी पहेलवान रोड तसेच इतर विकासकामांच्या प्रगतीबाबत नितीन गडकरी यांनी वर्धा रोडवरील निवासस्थानी बैठक घेतली. बैठकीत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, नगर भूमापन विभाग अधिकारी व नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केळीबाग रोडवरील शहीद चौक ते गांधीपुतळ्यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. परंतु टांगास्टँड ते गांधीपुतळा या रस्त्यावरील सोनचाफा या इमारतीतील दुकानदार टीडीआर घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रियाच रखडली आहे. ही इमारत हटवून भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या जागेचे लवकर भूसंपादन करून रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले.
याच रस्त्यावरील रामभाऊ पाटोडीवाला या इमारतीत मालक व भाडेकरू यांचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. बडकस चौक ते कोतवाली या दरम्यान १३ मालमत्तांची प्रक़रणे न्यायालयात आहेत. यावर न्यायालयाचा निर्णय आल्याशिवाय काम करता येणार नाही. असे असले तरी रस्त्यालगत ड्रेनेजचे काम मात्र सुरू करा, असेही निर्देश गडकरींनी दिले. दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या महालातील केळीबाग रोडच्या रुंदीकरणाच्या कामात येणारे अडथळे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी समन्वय साधून दूर करावे व रुंदीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
भूसंपादन विभागावर संताप
रामजी पहेलवान या रस्त्यावरील ७२ जणांनी आपली मालमत्ता देऊन पैसे घेतले आहे. रामजी पहेलवान ते मॉडेल मिल चौक या दरम्यान सध्या ६५ मालमत्तांपैकी ३० जणांनी मालमत्ता दिली आहे. नगर भूमापन विभाग आणि नगररचना विभागातील दप्तर दिरंगाईमुळे अनेक प्रस्ताव अडून पडलेले आहे. या दोन्ही विभागाच्या कामाबद्दल गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांच्या मालमत्ता आहेत, ते लोक नगर भूमापन व नगर रचना या दोन्ही विभागाकडे खेटे घालत असल्याची तक्रार आमदार प्रवीण दटके यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.