नागपूर

Nagpur: विदर्भात पुन्हा एकदा भाजपला धक्का, माविआने केला दणदणीत पराभव!

Latest Political News : कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विजयश्री संपादन करण्यात आल्याने हर्षोउल्हास साजरा करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ७ येथे अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी ४६.९६ टक्के मतदान करून पोट निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक मतदारांचे यादीतून नाव गहाळ झाले असतानासुद्धा महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षाच्या राखी परते यांनी भाजपच्या नंदकिशोर श्रीरामे यांच्यापेक्षा २८ मते जास्त घेऊन विजयी झाल्या.

नगरपरिषद व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिरालाल नारनवरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते देऊन सत्ताधारीविरूद्ध असलेला रोष मतदारांनी व्यक्त केला.

या निवडणुकीत ३० टक्क्यांच्यावर स्थानिक मतदार मतदानापासून वंचित राहिल्यानंतरसुद्धा शिवसेना (उबाठा) गटाचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) गटाचे तालुकाप्रमुख कैलास खंडार, समीर मेश्राम, कॉंग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, उपाध्यक्ष नरेश बर्वे, युवक कॉग्रेसचे आकिब सिद्दीकी, नगरसेविका रेखा टोहणे, राकॉं (शरद पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष किशोर बेलसरे, अशोक पाटील, बीआरएसपी राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सुखलाल मडावी, प्रहारचे नगरसेवक विनय यादव, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दारोडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विजयश्री संपादन करण्यात आल्याने हर्षोउल्हास साजरा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची झाली ऑनलाइन बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT