नागपूर

Budget for Agriculture: केंद्रीय अर्थसंकल्प, कही खुशी कही गम! शेतीसाठी निराशाजनक असल्याच्या प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

Budget 2023 Washim Agriculture: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. या अर्थसंकल्पात देशातील सर्वांगीण घटकाचा विचार करण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला तर या अर्थसंकल्पात शेतकरी व शेतमजूरांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करण्यात आला.

पायाभूत सुविधांवर विशेष भर देणाऱ्या या अर्थसंकल्पाबाबत अनेक मान्यवरांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. करप्रणाली ‘जैसे थे’ असल्याने नोकरदारांनी आनंद व्यक्त केला आहे तर पंतप्रधान आवास योजनेच्या तरतुदीबाबत समाधान व्यक्त होत आहे. मुद्रा योजनेतील महिलांच्या लक्षणीय वाट्याबाबत महिलांनी आनंद व्यक्त केला.

समृद्ध भारताचा आरसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या सर्व घटकांचा विकास साधणारा आहे. देशाच्या विकासाचा तानाबाना या अर्थसंकल्पाने विणला आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला यांच्यासह ग्रामीण भारताच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.-आमदार लखन मलिक, वाशीम

अमित झनक नावाने वारात, शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने
आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शेतकरी व सर्वसामान्य माणसाकडे संपुर्ण दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात कोणताही फायदा मिळाला नाही. हा अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा हा प्रश्न निर्माण झाला. (Latest Marathi News)

अर्थसंकल्पात धनदांडग्याचा विचार केला गेला. एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा दावा करण्यात आला असला तरी शेतमालाचे खाली आलेले दर शेतकऱ्यांसाठी नुकसान करणारे ठरत आहेत. या अर्थसंकल्पात याबाबत काहीही तरतूद केली नाही.
आमदार अमित झनक, रिसोड विधानसभा

बोलाचाच भात......
केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकरी व सर्वसामान्य माणसाला निराशेच्या गर्तेत ढकलण्याचे काम केले आहे. फक्त मागील योजनांच्या घोषणांची रिहर्सल होत असल्याचा भास होत होता. निर्मला सितारामण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. एकीकडे पीकविमा योजनेच्या संदर्भात बडेजाव माजविला गेला असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना छदामही मिळत नसल्याचे वास्तव असल्याने मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प केवळ फसवा अर्थसंकल्प आहे.Latest Marathi News | Breaking Marathi News | Live News in Marathi | Sakal (esakal.com)
बाबाराव पाटील खडसे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai School Holiday: मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबईत मुसळधार! लोकलसेवेवर मोठा परिणाम, ट्रेन तब्बल ३० ते ४५ मिनिटे उशीराने, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

Politics: लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य, भाजप आमदारामुळे महायुतीचं सरकार अडचणीत?

Rain Update: पालघर आणि नाशिकसाठी रेड अलर्ट, तर मुंबईसह पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, वाचा 26 सप्टेंबरला कशी असेल पावसाची स्थिती?

Pune Baner Road Traffic Jam: पुण्यातील बाणेर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी! कामावरुन घराकडं निघालेले पुणेकर वैतागले

SCROLL FOR NEXT