नागपूर

Nagpur Water Crisis: नागपूरकरांनो, पाणी वापरा जपून! तोतलाडोह व कामठी-खैरी प्रकल्पांची पातळी खोलात, करा 'या' उपाययोजना

नागपूरकरांची तहान भागविणाऱ्या तोतलाडोह व कामठी-खैरी प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा कमी असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

Manoj Bhalerao

Nagpur Water Crisis: नागपूरकरांची तहान भागविणाऱ्या तोतलाडोह व कामठी-खैरी प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा कमी असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर केल्यास संभाव्य संकटावर मात करता येऊ शकते.

उन्हाळा उंबरठ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘सकाळ’ने नागपूर व विदर्भातील प्रमुख जलसाठ्यांचा आढावा घेतला असता, चित्र फारसे उत्साहवर्धक दिसून आले नाही. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील तोतलाडोह व कामठी-खैरी या दोन मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास स्थिती अतिशय चिंताजनक आहे.

सध्याच्या घडीला पेंच नदीवरील तोतलाडोह जलसाठ्यात ६३.९६ टक्के पाणी उपलब्ध आहे, जे गतवर्षीच्या तुलनेत (६६.३० टक्के) तीन टक्के कमी आहे. कामठी-खैरी जलसाठ्याची स्थिती आणखीनच नाजूक आहे. येथे केवळ ५०.८९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला ७१.९७ टक्के जलसाठा होता.

यंदाच्या उन्हाळ्यातील मार्च, एप्रिल, मे आणि जून हे चार महिने शिल्लक असल्यामुळे परिस्थिती निश्चितच गंभीर आहे. भविष्यातील पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी नागपूरकरांना आतापासूनच आवश्यक काळजी घ्यावी लागणार आहे. आगामी दिवसांमध्ये पाण्याचे योग्य नियोजन व काटकसरीने वापर केल्यास यंदाच्या उन्हाळ्यातही नागपूरकरांची तहान सहज भागू शकते. (Latest Marathi News)

विदर्भातील धरणांचीच स्थिती नाजूक

विदर्भातील नागपूर व अमरावती विभागातील विविध मोठ्या, मध्यम व छोट्या धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यांचा विचार केल्यास, परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. सद्यस्थितीत नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ५८.६८ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे, जो गतवर्षीच्या (६२.२१ दशलक्ष घनमीटर) तुलनेत सहा टक्के कमी आहे. तर अमरावती विभागात गतवर्षीच्या (७१.१० दशलक्ष घनमीटर) तुलनेत १४ टक्के कमी अर्थात ५७.८४ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. मध्यम व लघू (छोट्या) प्रकल्पांमध्येही गतवर्षीपेक्षा साठा कमीच आहे.

संभाव्य पाणीटंचाईवर काही उपाययोजना

  • पाण्याचा गैरवापर टाळा

  • पाण्याचा पुनर्वापर करा

  • अंघोळ बादलीभर पाण्यातच संपवा

  • शॉवरचा उपयोग शक्यतो टाळा

  • नळाच्या तोट्यांची दुरूस्ती करून घ्या

  • नळाच्या पाण्याद्वारे गाड्या धुणे किंवा जनावरांना अंघोळ करणे टाळा

  • वॉश बेसिनवरील नळ सुरू ठेवून तोंड धुणे टाळा

  • सार्वजनिक नळाचे पाणी धो-धो वाहात असेल तर लगेच प्रशासनाला कळवा

  • कुलरचा वापर काळजीपूर्वक करा(Latest Marathi News)

  • स्वतःला पाणीबचतीची सवय लावा, दुसऱ्यालाही महत्त्व सांगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT