नागपूर

Nagpur Water Pollution: अर्ध्या नागपूरचे आरोग्य धोक्यात ! कन्हान नदी सर्वाधिक प्रदूषित, पाणी पिणे अपायकारक

सकाळ डिजिटल टीम

Nagpur River Water Pollution: नागपूरकरांची तहान भागवणाऱ्या कन्हान नदीचा सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये समावेश असल्याने उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागातील रहिवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ओसीडब्ल्यू कंपनीच्यावतीने शुद्ध पाणी पुरवठ्याचा दावा केला जात असला तरी आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.

वायू प्रदूषणाने उपराजधानीतील नागरिक त्रस्त असताना आता दुसरीकडे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नद्यांच्या स्वच्छतेबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील कन्हान नदीच्या जल प्रदूषणाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. या नदीतून उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपूरच्या काही भागात पाणीपुरवठा होतो. विशेष म्हणजे पारशिवनी ते कुही या परिसरातील पाण्याची गुणवत्ता धोकादायक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

पारशिवनी ते कुही या परिसरात सांडपाणी, ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या धुळीसह इतरही कारणाने कन्हान नदीचे पाणी दूषित झाले आहे. कन्हान नदी नागपूरची जीवनवाहिनी असली तरी आता प्रदूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उद्योगापेक्षा गावे, पालिका क्षेत्रातून निघाणारे सांडपाणी हेही नदी प्रदूषणास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या सांडपाण्यात

मोठ्या प्रमाणात तेल, डीटरजेंट, विविध जड धातू, रसायने, शहरातील नाल्यांवाटे वाहत असलेले प्लास्टिक, जैविक कचरा, मलमूत्र आणि मोठ्या प्रमाणात जीव जंतू समाविष्ट असतात. असे पाणी पिण्यास घातक असून टायफाईड, डायरिया आणि इतर रोग होण्याची शक्यता असते. तसेच शेतांतील कीटकाशके, रासायनिक खते, प्राण्याच्या विष्टा आणि जैविक कचरा हा नद्यांच्या सर्वसाधारण प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर घालत आहेत.(Latest Marathi News)

असा ठरतो नद्यांचा प्रदूषित पट्टा

■ देशभरातील नद्यांतील प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ 'नॅशनल वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग प्रोगाम' राबवत असते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण किती आहे? यावर पाण्याचे प्रदूषण ठरविले जाते. यासाठी मंडळाकडून नद्यांतील पाण्याचे नमुने गोळा करत प्रयोगशाळेत त्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर नद्यांचा प्रदूषित पट्टा ठरवला जातो. देशभरातील २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांतील ६०३ नद्यांपैकी ३११ नद्यांची काही क्षेत्र प्रदूषित • आढळल्याचे विश्लेषण ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी नद्यांच्या अहवालातून केले आहे.

तातडीने हव्यात उपाययोजना

■ सर्व लहान-मोठ्या उद्योगांना सांडपाणी प्रक्रिया संयंत्र व जलशुद्धीकरण यंत्रणा सतत सुरू ठेवणे आवश्यक केले पाहिजे. या यंत्रणा लावणे व सुरू ठेवणे आवश्यक असले तरी त्या बंद ठेवल्या जातात. सांडपाणी नाल्यात सोडणे कायद्याने गुन्हा आहे. तरी अनेक पालिका घाण नद्यांत सोडतात. शेतीमध्ये जैविक खते आणि कीटकनाशके वापरली जावीत. नद्यात प्रवेश करणारे जलस्त्रोत शुद्ध करून सोडावेत. तरच नद्यांचे प्रदूषण थांबू शकते. (Latest Marathi News)

कसे मोजतात प्रदूषण?

■ नद्यांतील पाण्यांचे नमुने गोळा केले जातात. त्यात फिजिओ केमिकल, बॅक्टेरिओलॉजिकल, मेटल्स आणि पेस्टिसाइड्सच्या मापदंडाच्या आधारे प्रदूषण ठरवले जाते. पाण्यातील प्राणवायूचे आवश्यक प्रमाण गृहित धरले जाते. त्यानुसार नद्यांची वर्गवारी केली जाते. सर्वाधिक प्रदूषित नद्यांना उपाययोजनेनुसार प्राधान्यक्रम दिला जातो. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT