Nagpur Water sakal
नागपूर

Nagpur Water : शहरातील अनेक भागांत उद्या पाणीबाणी

विविध कामासाठी पेंच-१, पेंच-२, पेंच-३ आणि पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्राचे पंपिंग बंद राहणार असल्याने २६ जूनला सायंकाळपासून या चारही पंपिंग स्टेशनहून शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विविध कामासाठी पेंच-१, पेंच-२, पेंच-३ आणि पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्राचे पंपिंग बंद राहणार असल्याने २६ जूनला सायंकाळपासून या चारही पंपिंग स्टेशनहून शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे ९ झोनमधील शेकडो वस्त्यांना २६ जूनच्या सायंकाळपासून पाणीपुरवठा होणार नाही. महावितरणने नवेगाव खैरी येथील ३३ केव्ही महापालिकेच्या एक्स्प्रेस फीडरवर देखभाल दुरुस्तीसाठी २६ जूनला वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पेंच -४ चे ट्रान्सफॉर्मर बदलले जाणार आहे. अमृत योजनेंतर्गत सुगतनगर येथे जलवाहिन्यांच्या इंटरकनेक्शनचे कामही केले जाणार आहे. यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

झोन : वस्त्यांची नावे

लक्ष्मीनगर - लक्ष्मीनगर जुने, गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला, टाकळीसीम, जयताळा, त्रिमूर्तीनगर, लक्ष्मीनगर नवीन

धरमपेठ - रामनगर, फुटाळा लाइन, सिव्हिल लाइन, रायफल लाइन, सेमिनरी हिल्स, दाभा, टेकडी वाडी, सीताबर्डी, धंतोली

हनुमाननगर - चिंचभवन, श्रीनगर, नालंदानगर, ओंकारनगर, जोगीनगर, हुडकेश्वर, नरसाळा

गांधीबाग - सीताबर्डी फोर्ट १, २, किल्ला महाल, गोदरेज आनंदम, मेडिकल फीडर

धंतोली - वंजारीनगर रेशीमबाग, हनुमाननगर

मंगळवारी - गिट्टीखदान, गोरेवाडा, राजनगर, सदर

सतरंजीपुरा - बोरियापुरा, मध्य रेल्वे

नेहरूनगर - सक्करदरा १, २

आशीनगर - नारा, नारी, जरीपटका

पांडे लेआऊट फीडरवर शटडाऊन

२६ जूनला सकाळी ११ ते २७ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पांडे लेआऊट फीडरच्या देखभाल दुरुस्तीसाठी २४ तासांचे शटडाऊन घेण्यात येणार आहे. यात ७०० एमएम व्यासाचे वॉल्व बदलण्यात येणार आहे. गांधीनगर टी पॉइंटवर हे काम होत आहे. त्याचा परिणाम गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला, टाकळी सिम, जयताळा, त्रिमूर्तीनगर, रामनगर, चिंचभवन या जलकुंभावरून पाणीपुरवठा होणाऱ्या शेकडो वस्त्यांवर होणार आहे. या वस्त्यांमध्ये २६ जूनला सायंकाळी आणि २७ जूनला सकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT