Nagpur Weather Update Sakal
नागपूर

Nagpur Weather Update : विदर्भावर सूर्य कोपला, पारा वाढला; नागपूर ४५.६, ब्रह्मपुरी @ ४७.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात उन्हाच्या लाटेने भीषण रूप धारण केले असून, सोमवारी नागपूरच्या तापमानाने जोरदार उसळी घेत यंदाच्या उन्हाळ्यातील नवा उच्चांक नोंदविला. तर ब्रह्मपुरीच्या पाऱ्याने ४७ अंशांची विक्रमी उडी मारली. प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात आणखी दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिल्याने उन्हाचा भडका आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा सहन करणाऱ्या नागपूरकरांना सोमवारीही नवतपाचे जोरदार चटके बसले. गेल्या २४ तासांत उपराजधानीच्या कमाल तापमानात ३.२ अंशांची वाढ होऊन या मोसमात पारा प्रथमच पंचेचाळिसपार (४५.६ अंश सेल्सिअस) गेला. विदर्भात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे नोंदले गेले. येथे नोंद झालेले ४७.१ अंश सेल्सिअस तापमान विदर्भासह संपूर्ण राज्यात उच्चांकी ठरले. अचानक ऊन वाढल्याने प्रचंड उकाडा जाणवत असून, नागपूरकर अक्षरशः घामाघूम झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पराभवाची हॅट्‌ट्रिक करायची असेल, तर राजन तेलींनी निवडणूक लढवावी'; दीपक केसरकरांचं थेट चॅलेंज

Latest Maharashtra News Updates Live : मुंबईत सर्वाधिक जागा भाजपला मिळणार?

जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थ मृत ब्राम्हणाला देणार जीवनदान ; प्रोमोची होतेय चर्चा

Chh.Sambhajinagar Assembly election 2024 : छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात समस्यांचे बुरूज

Gold-Silver Price: दिवाळी अगोदर सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर; चांदीही 1,000 रुपयांनी वाढली, भाववाढीचे कारण काय?

SCROLL FOR NEXT